गाढी नदीत मुंबईचे दोघे बुडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2017 02:06 IST2017-06-27T02:06:46+5:302017-06-27T02:06:46+5:30
पनवेल तालुक्यातील गाढी नदीत दोन जण बुडाल्याची घटना सोमवारी घडली असून, दोघेही मुंबईचे राहणारे होते. तालुका पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.

गाढी नदीत मुंबईचे दोघे बुडाले
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल तालुक्यातील गाढी नदीत दोन जण बुडाल्याची घटना सोमवारी घडली असून, दोघेही मुंबईचे राहणारे होते. तालुका पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.
किशोर मोतीराम चामुर (५० रा. खार, मुंबई), दीपक मोहन खडू (१२ रा. मुंबई), अशी दोघांची नावे आहेत. किशोर चामुर यांच्यासह चौघे जण गाढेश्वर धरण परिसरात रविवारी गेले होते. या ठिकाणी मौजमजा केल्यावर सोमवारी सकाळी दीपक खडू हा १२ वर्षीय मुलगा शिवणसई गावाजवळील पुलाखालील पाण्यात उतरला. मात्र, अंदाज न आल्याने तो बुडू लागला. हे पाहताच किशोरने दीपकला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. दीपकने किशोरला पाण्यात घट्ट मिठी मारल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला.