शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाला आणखी दोन दिवस बसणार पावसाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 20:07 IST

२९ मार्च रोजी महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता

ठळक मुद्देरविवारी गारपीटीचा इशारा महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल व किमान तापमानात किंचित घट

पुणे : मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ कोकण, गोव्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाला आणखी दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात रविवारी २९ मार्च रोजी जोरदार वार्‍यासह गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़उत्तर केरळ ते दक्षिण छत्तीसगड आणि कर्नाटक, मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही बाजूंनी तसेच कर्नाटक ते दक्षिण गुजरात असा द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दक्षिणकडून येणारे वारे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराकडून बाष्पयुक्त वारे आपल्याकडे खेचून घेत आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्य प्रदेशापर्यंत पाऊस पडतआहे. शनिवारी सकाळी संपलेल्या २४ तासात गंगापूर येथे ४१ मिमी इतका पाऊस पडला.राहुरी २८, अहमदनगर ६, फुलंब्री २०, बुलढाणा २, अमरावती, ब्रम्हपूरी,सिंधखेड राजा येथे प्रत्येकी १ मिमी आणि सातारा व पुणे येथे ०.७ मिमीपावसाची नोंद झाली होती.कोकण, गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल व किमान तापमानात किंचित घट झाली आहे.२९ मार्च रोजी महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.३० मार्च रोजी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांच्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक  ठिकाणी सोसाट्याच्या वार्‍यासह पावसाची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसVidarbhaविदर्भFarmerशेतकरीweatherहवामान