दोघा कजर्बाजारी शेतक:यांची आत्महत्या

By Admin | Updated: August 20, 2014 01:59 IST2014-08-20T01:59:55+5:302014-08-20T01:59:55+5:30

पारोळा (जळगाव) : कर्जबाजारीपणाला कंटाळून अहमदनगर व जळगाव जिल्ह्यातील दोघा शेतक:यांनी आत्महत्या केली.

Two lashing farmers: Suicides | दोघा कजर्बाजारी शेतक:यांची आत्महत्या

दोघा कजर्बाजारी शेतक:यांची आत्महत्या

मिरजगाव (जि. अहमदनगर)/ पारोळा (जळगाव) : कर्जबाजारीपणाला कंटाळून अहमदनगर व जळगाव जिल्ह्यातील दोघा शेतक:यांनी आत्महत्या केली.
अहमदनगर जिल्ह्यातील मिरजगाव येथील शेतकरी रावसाहेब जगन्नाथ बनकर (45) यांनी सोसायटी, पतसंस्था व उसनवारीने घेतलेल्या पैशांची परतफेड वेळेत होत नसल्याने जीवन संपविले. त्यांनी पाणी नसलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. दोन वर्षापूर्वी त्यांनी मुलीचा विवाह व स्वत:च्या आजारपणाच्या उपचारासाठी कर्ज घेतले होते. बँक, पतसंस्था व इतरांकडून पैशांचा तगादा सुरू झाल्याने ते चिंतेत होते, तर जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील तरवाडे येथील अभिमन माणिक पाटील (5क्) यांनीही कर्जबाजारीपणाला कंटाळून सोमवारी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली.  (वार्ताहर)

 

Web Title: Two lashing farmers: Suicides