शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
2
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
3
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
4
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
5
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
6
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
7
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
8
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
9
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
10
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
11
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
12
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
13
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
14
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
15
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
16
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
17
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
18
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
19
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
20
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात

दोन गटात हाणामारी; १२ जणांविरूद्ध गुन्हा!

By admin | Updated: January 22, 2017 20:36 IST

जुन्या वादातून दोन गटात लोखंडी पाईप, काठयाने तुंबळ हाणामारी झाली.

ऑनलाइन लोकमतजउळका रेल्वे, दि. 22 - जुन्या वादातून दोन गटात लोखंडी पाईप, काठयाने तुंबळ हाणामारी झाली. यात एकजण गंभीर जखमी झाला. जऊळका रेल्वे पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या डव्हा फाट्यावर घडलेल्या या घटनेप्रकरणी परस्परांविरूद्ध दाखल तक्रारींवरून पोलिसांनी दोन्ही गटातील १२ जणांना रविवार, २२ जानेवारीला अटक केली. यासंदर्भात खिर्डा येथील महादेव काळापाड याने जउळका रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की वाशिम येथील रुग्णालयात शेषराव काळापाड यांच्यासमवेत जात असताना डव्हा फाट्यावरील ढाब्यावर जेवणासाठी थांबलो असताना एकनाथ वंजारे, सुरेश वंजारे, शामराव वंजारे, सुरेश महाजन, नारायण धनगर, रामदास  महाजन आदिंनी जुन्या वादातून शिविगाळ करत लोखंडी पाईप आणि काठीने डोक्याला व पायाला मारहान करून जखमी केले. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी एकनाथ वंजारे, सुरेश वंजारे, शामराव वंजारे, सुरेश महाजन, नारायण धनगर, रामदास महाजन या सहा जणांविरुद्ध कलम १४३, १४७, १४९, ३२३, ३२४, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला. दुसऱ्या गटातर्फे एकनाथ वंजारे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की मी व माझा मेहुणा सुरेश महाराज दुचाकीने खिर्डा गावाकडे येत असताना आरोपींनी जुन्या वादातून आपणास मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. अशा तक्रारीवरून पोलिसांनी महादेव काळापाड, सुधाकर काळापाड, गोविंदा काळापाड, शेषराव काळापाड, अभिमान काळापाड, मारोती काळापाड या ६ जणांवर १४३, १४७, १४९, ३२३, ३२४, ५०६ भादंविअन्वये गुन्हा दाखल केला. संबंधित १२ ही आरोपींना रविवारी अटक करण्यात आली असून पुढील तपास जऊळका पोलिस करित आहे.