भातसा नदीत अंधेरीत राहणारी दोन मुलं बुडाली, एकाचा सापडला मृतदेह  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 08:52 IST2017-08-24T08:49:38+5:302017-08-24T08:52:08+5:30

भातसा नदीत दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. बुधवारी (23 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.

Two children drowning in the dark in the river Bhatsa, one was found dead | भातसा नदीत अंधेरीत राहणारी दोन मुलं बुडाली, एकाचा सापडला मृतदेह  

भातसा नदीत अंधेरीत राहणारी दोन मुलं बुडाली, एकाचा सापडला मृतदेह  

ठळक मुद्देभातसा नदीत दोन मुलांचा बुडून मृत्यूबु़डालेली दोन्ही मुलं अंधेरीतील रहिवासीपाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोन जण बुडाले

शहापूर, दि. 24 - भातसा नदीत दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. बुधवारी (23 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. यापैकी एका मुलाचा मृतदेह सापडला असून दुस-याचा शोध सुरू आहे. मुंबईतील गोदरेज महाविद्यालयातील 7 ते 8 मुलांचा समूह बुधवार पिकनिकसाठी वासिंदजवळ एका मित्राकडे आली होती. यातील अल्ताफ हुसैन अली अन्सानी (वय 21 वर्ष) आणि फरीद मयुद्दिन सय्यद (वय 20 वर्ष)  हे दोघंजण भातसा नदीत आंघोळीसाठी गेले होते. मात्र पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते दोघंही बुडाले. हे दोघंही अंधेरी येथील रहिवासी आहेत. 

यातील अल्ताफचा मृतदेह सापडला आहे तर फरीद अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे.  मृतदेहाचा शोध घेण्यासाठी कल्याण येथील अग्निशमन दलाच्या पथकाला मदतीसाठी बोलावले आहे.  दरम्यान, शहापूर नायब तहसीलदार कोमल ठाकूर, वासिंद पोलीस निरीक्षक गंगाराम वळवी, मंडळ अधिकारी आदेश म्हात्रे, तलाठी गणेश विशे यांनी घटनास्थळाला भेट दिली.

Web Title: Two children drowning in the dark in the river Bhatsa, one was found dead

टॅग्स :Accidentअपघात