शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत खदानीच्या तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 23:14 IST

दोघे मित्रांसोबत गेले होते पोहोयला. मित्रांच्या माहितीनंतर आजूबाजूच्या नागरिकांनी पोलीस, अग्निशमन दलाला दिली माहिती.

ठळक मुद्देदोघे मित्रांसोबत गेले होते पोहोयला.मित्रांच्या माहितीनंतर आजूबाजूच्या नागरिकांनी पोलीस, अग्निशमन दलाला दिली माहिती.

भिवंडी : मित्रांसोबत खदानीच्या तलावात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना भिवंडीतील पोगाव येथे बुधवारी सायंकाळी घडली आहे. अग्निशमन दलाच्या पथकाकडून मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र अंधार पडल्याने शोधपथकाला शोधकार्य थांबवावे लागले असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. 

मोहम्मद यासिम मोहम्मद ईस्लाम शेख ( वय-१५ वर्षे, रा. शांतीनगर) व मोहम्मद इम्रान वकिल अहमद खान ( वय १८ वर्षे, रा. गायत्री नगर ) असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या दोघा मुलांची नावे असून ते सायंकाळी मित्रांसोबत मस्करपाडा पोगाव येथील येथे असलेल्या एका खदानीच्या तलावात पोहण्यासाठी गेले होते. मात्र यासीम व इम्रान या दोघांनी पाण्यात उडी घेतली असता पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. 

मित्र पाण्यात बुडत असल्याने या दोघांसोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा करत मित्र बुडल्याची माहिती आजूबाजूच्या नागरिकांना दिली असता येथील नागरिकांनी अग्निशमन दलासह पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी तालुका पोलीस व अग्निशमन दल दाखल होत दोन्ही बुडालेल्या मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र सायंकाळी उशीर झाल्याने व अंधार पडल्याने शोध कार्य थांबविण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी सात वाजेपासून शोधकार्य सुरु करण्यात येणार असल्याची माहिती तालुका पोलिसांकडून देण्यात आली आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीdrowningपाण्यात बुडणेMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसFire Brigadeअग्निशमन दल