डंपरची दुचाकीला धडक; सख्खे भाऊ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 00:18 IST2021-06-18T00:17:32+5:302021-06-18T00:18:38+5:30
भरधाव डंपरने मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार सख्खे भाऊ ठार झाले.

डंपरची दुचाकीला धडक; सख्खे भाऊ ठार
जळगाव : भरधाव डंपरने मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार सख्खे भाऊ ठार झाले. ही घटना भुसावळनजीकराष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास घडली.
मनीष सुरेश दर्डा ( ३०) रितेश सुरेश दर्डा (२७, रा. सिंधी कॉलनी) अशी या ठार झालेल्या भावंडांची नावे आहेत. ते दोघे दुचाकीने जळगावहूनभुसावळकडे जात होते. साकेगावनजीक मागून येणाऱ्या डंपरने दुचाकीला धडक दिली. यात मनीष हा जागीच ठार झाला तर रितेश यास जखमी अवस्थेत गोदावरी हॉस्पीटलमध्ये आणल्यानंतर काही वेळातच त्याची प्राणज्योत मालवली.