"तुमची बातच न्यारी..."; प्रियंका चतुर्वेदी अन् संजय शिरसाट यांच्यात ट्विटर'वॉर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 12:26 IST2023-07-31T11:31:10+5:302023-07-31T12:26:09+5:30

आपण कशा दिसता किंबहुना आपल्या भाषेत सांगायचे झाले तर चरित्र्याचे धिंधवडे आपल्याच पक्ष्यातील श्रीमान खैरे यांनी उडवले आहेत असं शिरसाट म्हणाले.

Twitter 'war' between Shivsena Priyanka Chartuvaidi and Sanjay Shirsat | "तुमची बातच न्यारी..."; प्रियंका चतुर्वेदी अन् संजय शिरसाट यांच्यात ट्विटर'वॉर'

"तुमची बातच न्यारी..."; प्रियंका चतुर्वेदी अन् संजय शिरसाट यांच्यात ट्विटर'वॉर'

मुंबई – प्रियंका चतुर्वेदींच्या सौदर्यांवरून आदित्य ठाकरेंनी त्यांना खासदारकी दिली असा खोचक टोला शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी लगावला होता. त्यावरून आता संजय शिरसाट आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यात ट्विटरवर चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे  हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही, ज्याने ५० खोक्यांसाठी आपला आत्मा आणि प्रामाणिकपणा विकला असा घणाघात संजय शिरसाट यांच्यावर प्रियंका चतुर्वेदी यांनी केला आहे.

प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, संजय शिरसाट हे राजकारण आणि महिलांबद्दलच्या त्यांच्या विचारांमधील व्यापक आजाराचे एक उत्तम उदाहरण आहे, ते त्यांच्या टिप्पण्यांमधून स्वतःचे असभ्य चारित्र्य निश्चितपणे प्रदर्शित करतात, यात आश्चर्य नाही की भाजपने त्यांना त्यांच्यासोबत ठेवले आहे. चारित्र्यहिन व्यक्तीवर मी बोलणार नाही. स्वत:चे चारित्र्य नसल्याने भाजपासोबत गेले आहेत. ज्यांना त्यांचे चारित्र्य नाही ते दुसऱ्यांच्या चारित्र्यावर प्रश्न उभे करतात असं त्यांनी म्हटलं.

तर आपण कशा दिसता किंबहुना आपल्या भाषेत सांगायचे झाले तर चरित्र्याचे धिंधवडे आपल्याच पक्ष्यातील श्रीमान खैरे यांनी उडवले आहेत. आपण जे मला विचारत आहत ते त्यांना विचारलं असतं तर अधिक संयुक्तिक ठरलं असतं. आम्ही कुठं तुम्हाला विचारलं की तुम्हांला का मत ?असो द्यायचं. गद्दारी तर स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचारांशी  कोणी केली ते दहा पक्ष फिरून आलेल्या कालच्या उपऱ्यांना काय कळणार ? आत्मा आणि  प्रामाणिकपणा असं प्रत्युत्तर आमदार संजय शिरसाट यांनी प्रियंका चतुर्वेदींना दिले आहे.

दरम्यान, काय छान बोलता...जसं सामान्य कार्यकर्त्यासारखं पोस्टर बॅनर लावंत घाम गाळून खासदार झालाय. खरा खासदारकीवर हक्क...चंद्रकांत खैरे... दिवाकर रावते...ह्या राबणाऱ्या कार्यकर्त्यांचा होता..पण तुमची बात जर न्यारी...जाल तिकडे भारी असा खोचक टोलाही संजय शिरसाट यांनी खासदार प्रियंका चतुर्वेदींना लगावला आहे.

 

Web Title: Twitter 'war' between Shivsena Priyanka Chartuvaidi and Sanjay Shirsat