शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 19:58 IST

माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी अशी मागणी त्या कुटुंबाने केली. महाराष्ट्र पोलिसांवर, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचा विश्वास राहिला नाही असंही मेहबुब शेख यांनी म्हटलं.

मुंबई - सातारा जिल्ह्यातील फलटण येथे महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्येनंतर राजकीय वादंग निर्माण झाले आहे. या मृत्यूमागे सत्ताधारी भाजपाचे माजी खासदार जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते मेहबुब शेख यांनी काही पत्र दाखवत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

मेहबुब शेख म्हणाले की, मी जे बोलतोय, ती वस्तूस्थिती मांडली आहे. मुख्यमंत्र्‍यांना सगळ्या गोष्टी अवगत आहे. ते का या गोष्टीवर पडदा टाकतायेत कळत नाही. ज्याने या गोष्टीत फिर्याद केली, त्याने मला अर्ज पाठवला आहे. या मुलीची आत्महत्या संशयास्पद असून त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी कुटुंबाची मागणी आहे. फिर्यादीने पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटलंय, २३ ऑक्टोबरला आम्ही बीडहून फलटणसाठी रवाना झालो. २४ ऑक्टोबरला तिथे पोहचलो. आम्हाला उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. हॉटेलमधून मृतदेह कधी आणला याची कल्पनाही आम्हाला देण्यात आली नाही असा त्यांचा आरोप आहे. लटकलेल्या अवस्थेत मृतदेह असताना एखादा रक्ताचा नातेवाईक तिथे पंचनामा करताना हजर पाहिजे. कुटुंबाला न विचारताच मृतदेह हॉटेलमधून हलवण्यात आला. हॉटेल कुणाचे आहे हे अख्ख्या फलटणला माहिती आहे. यात पोलीस काय लपवतायेत असा सवाल त्यांनी केला.

तसेच पहाटे ३ वाजता नातेवाईक जिल्हा रुग्णालयात आले. डॉक्टर धुमाळ यांना वारंवार फोन करून ते ५ वाजता तिथे आले. पोस्टमोर्टम फॉरेन्सिक एक्सपर्टद्वारे इन कॅमेरा करायचे होते. मात्र इथं ती सुविधा उपलब्ध नाही तुम्ही साताऱ्यात जा असं धुमाळ यांनी सांगितले. सकाळी १० वाजता मृतदेह साताऱ्याला नेला. आरोपीचा बचाव करण्यासाठी पोलिसांनी दुपारी २ पर्यंत FIR दाखल केला नव्हता. पीडित मुलीचा भाऊ डॉक्टर तो पोस्टमोर्टमला हजर राहायला तयार होता, परंतु त्याला परवानगी दिली नाही. एका राजकीय गिधाडाला पाठीशी घालण्यासाठी काय चाललंय. पीडित कुटुंबाने या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी. माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी अशी मागणी त्या कुटुंबाने केली. महाराष्ट्र पोलिसांवर, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचा विश्वास राहिला नाही असंही मेहबुब शेख यांनी म्हटलं.

दरम्यान, ज्यानं भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढली, त्या आगवणे कुटुंबाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर दहशतीचे आरोप केले आहे. त्यांच्या मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. राज्यात कायदा आहे का असा प्रश्न निर्माण होतो. देवेंद्र फडणवीस न्यायाधीशांच्या खुर्चीत जाऊन बसतायेत, गृहमंत्री म्हणून क्लीनचीट देत असाल तर दुर्दैवी आहे. ननावरे नावाच्या कुटुंबाने रणजितसिंह निंबाळकरांमुळे आत्महत्या केली. मात्र पोलिसांना पुरावे मिळत नाही असा आरोप कुटुंब करत आहेत. या प्रकरणाचा काहीच तपास झाला नाही. महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या स्तराला नेऊन ठेवलंय असा आरोप शेख यांनी भाजपावर केला.   

English
हिंदी सारांश
Web Title : Falton doctor death case twist: Letter accuses ex-MP Ranjeetsinh Naik.

Web Summary : The Falton doctor's suicide sparks political turmoil. Mehboob Shaikh alleges ex-MP Ranjeetsinh Naik Nimbalkar is involved, citing a suspicious death and demanding an SIT investigation due to family concerns and lack of faith in police.
टॅग्स :Ranjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकरSatara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस