शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

उजनीतून भिमेत पाणी सोडण्याचे केले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 12:30 PM

वीर धरणातील विसर्ग वाढविला; बोगद्यातून सीना नदीत पाण्याचा प्रवाह संथ

ठळक मुद्देउजनी धरणातून विसर्ग बंद करण्यात आल्यामुळे तर वीर धरणातील विसर्ग कमी झाल्यामुळे भीमेतील पाण्याची पातळी खालावत चाललीवीर धरणातून नीरेत ४८८७ कुसेक्स विर्सग सुरू असताना शुक्रवारी पुन्हा धरण क्षेत्रात पाणी येत आहेधरणांमधील पाण्याची अशी स्थिती असताना जिल्ह्यातील शेतकरी मात्र पाऊस आणि उजनीच्या पाण्याच्या प्रतिक्षेत

सोलापूर : उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचे शुक्रवार सकाळपासून बंद करण्यात आले आहे. 

उजनी धरणातून विसर्ग बंद करण्यात आल्यामुळे तर वीर धरणातील विसर्ग कमी झाल्यामुळे भीमेतील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. वीर धरणातून नीरेत ४८८७ कुसेक्स विर्सग सुरू असताना शुक्रवारी पुन्हा धरण क्षेत्रात पाणी येत आहे. त्यामुळे सकाळी दहा वाजेनंतर विर्सगात वाढ करून १४ हजार १६१ पर्यंत नेण्यात आला आहे. धरणांमधील पाण्याची अशी स्थिती असताना जिल्ह्यातील शेतकरी मात्र पाऊस आणि उजनीच्या पाण्याच्या प्रतिक्षेत आहे. सीनेत सोडलेले पाणी अत्यंत संथ गतीने पुढे सरकत आहे. हीच स्थिती कालव्यांची आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार धरणांची पाणी स्थिती पुढीलप्रमाणे आहे. विर्सग बंद करण्यात आलेले धरणे: टेमघर, वारसगाव, पवणा, कासारसाई, भामाआसखेड, वडीवळे, पिंपळगाव जोग, माणिकहोह, येडगाव,वडज, विसापूर, उजनी. विर्सग सुरू असलेली धरणे. पानशेत: १९५४ क्युसेक्स, खडकवासला: ३४२४, मुळशी: ५000, कळमोेडी: १२९, चासकमान: १११0, आंध्रा: ९८0, गुंजवाणी: ३00, भाटघर: ८१0, नीरा देवघर: २४५८, वीर: १४१६१, डिंबे: १९२0, चिल्हेवाडी: ८४८, घोड: ११६0, बंडगार्डन: ११0६१, दौंड: ९१७५, वीरधरण: ४८८७, नीरा नरसिंगपूर: २४0१, पंढरपूर: ९३५८. कालव्याच्या शेवटच्या भागाला अद्याप पाणी मिळालेले नाही. अनेक ठिकाणचे पाणी बंद करण्यात आल्यामुळे शेतकरी नाराज झाले आहेत.

एकीकडे उजनी धरण भरल्यावर नदीत पाणी सोडण्यात आले, दुसरीकडे हेच वाया जाणारे पाणी शेतीला देण्याचे चांगले नियोजन करण्यात यावे अशी मागणी होत आहे. दरम्यान, हिप्परगा तलावासाठी सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात आले आहे़ याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी गुरूवारी बैठक घेऊन जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता धीरज साळे यांना सूचना दिल्या़

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater transportजलवाहतूकPandharpurपंढरपूरagricultureशेती