शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

तुकाराम मुंडे नाशिक महापालिकेचे आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 5:47 AM

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांची पुण्याहून अवघ्या १० महिन्यात बदली करण्यात आली आहे.

मुंबई : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांची पुण्याहून अवघ्या १० महिन्यात बदली करण्यात आली आहे. पीएमपी नावाने परिचित असणा-या या नागरी प्रवासी वाहतुकीत शिस्त आणण्याचे प्रयत्न करणा-या मुंडे यांना आता नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून पाठवण्यात आले आहे.तर नाशिक महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची बदली महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळाचे सह कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. आयएएस अधिकाºयांना सध्या दोन महिन्यातच बदलले जात आहे तेथे तुकाराम मुंडे यांना १० महिने पुण्यात मिळाले. पीएमपीमध्ये नगरसेवकांनीच त्यांच्या वशिल्याने कंत्राटी कामगारांची भरती केली होती. त्यातील काम न करणाºया २५० कंत्राटी कामगारांना मुंडे यांनी कामावरुन कमी केले होते. पीएमपीच्या इमारतीतील राष्टÑवादी काँग्रेसच्या कामगार संघटनेचे कार्यालय होते. ते हटविण्याची नोटीस मुंडे यांनी मंगळवारी दिली होती. मात्र, कारवाई करण्यापूर्वीच त्यांच्या बदलीचे आदेश बुधवारी निघाले. मुंडे यांच्या जागी नैना गुंडे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सचिव म्हणून औरंगाबादचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची बदली करण्यात आली होती ; पण ती भाजपा नेत्यांनीच रद्द करायला लावली. त्यामुळे त्या जागी आता एमएसआरडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. कुरुंदकर ३१ आॅगस्ट २०१८ ला निवृत्त होत आहेत. पुणे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेमा देशभ्रतार यांची बदली सामाजिक न्याय विभागात उपसचिव म्हणून करण्यात आली आहे. दूध फेडरेशन (महानंद)च्या व्यवस्थापकीय संचालकपदी दिपककुमार मिना यांची नेमणूक करण्यात आली आहे.>नैना गुंडे यांची नियुक्तीआयएएस अधिकाºयांची सध्या दोन महिन्यांतच बदली केली जात आहे़ मुंडे यांना मात्र पुण्यात १० महिने कार्यकाळ मिळाला़पीएमपीच्या इमारतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय होते़ते हटवण्याची नोटीस मुंडे यांनी मंगळवारी दिली आणि त्यांच्या बदलीचे आदेश बुधवारी निघाले़ त्यांच्या जागी नैना गुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ त्यामुळे चर्चा रंगली आहे़

टॅग्स :Nashikनाशिकtukaram mundheतुकाराम मुंढे