‘तुकाराम मुंडे यांना केडीएमसीत आणा’

By admin | Published: October 31, 2016 04:02 AM2016-10-31T04:02:42+5:302016-10-31T04:02:42+5:30

नवी मुंबई महापालिकेचे वादग्रस्त आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेचा पदभार स्वीकारावा.

Tukaram Munde to KDMC | ‘तुकाराम मुंडे यांना केडीएमसीत आणा’

‘तुकाराम मुंडे यांना केडीएमसीत आणा’

Next


डोंबिवली : नवी मुंबई महापालिकेचे वादग्रस्त आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेचा पदभार स्वीकारावा. येथील लाखो नागरिक त्यांचे स्वागतच करतील, असे मत मनसेचे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी व्यक्त करताना आयुक्त ई. रवींद्रन यांच्यावर टीका केली.
कदम म्हणाले की, केडीएमसी आयुक्त ई. रवींद्रन यांनी मनपा निवडणुकीआधी ११ नगरसेवकांना बेकायदा बांधकामांच्या आरोपाखाली नोटीस पाठवल्या होत्या. त्यात काँग्रेसच्या एका नगरसेवकाला तोटा झाला, पण उर्वरित नगरसेवक पुन्हा निवडून आले. आता मात्र आयुक्त गप्प झाले आहेत. निवडणूक जवळ नाही, अशी टीका त्यांनी केली. त्यांनाही त्यांचे मुंडे होतील की काय अशी भिती असावी, असा टोला त्यांनी लगावला. या महापालिकेला कणखर नेतृत्व, स्वबळावर चालणारा आयुक्त हवा. यासाठी मुंडे यांनी येथे यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Tukaram Munde to KDMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.