सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा भरू न काढण्याचा प्रयत्न! अमरावती विभागात साडेतेरा लाख बियाणे उपलब्ध

By Admin | Updated: June 7, 2014 23:55 IST2014-06-07T22:32:47+5:302014-06-07T23:55:18+5:30

खरीप हंगामात वर्‍हाडातील पाच जिल्ह्यातील १६ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होणार असल्याचा अंदाज

Try not to fill the soybean seeds shortage! Available in the Amravati region, there are about one and a half million seeds | सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा भरू न काढण्याचा प्रयत्न! अमरावती विभागात साडेतेरा लाख बियाणे उपलब्ध

सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा भरू न काढण्याचा प्रयत्न! अमरावती विभागात साडेतेरा लाख बियाणे उपलब्ध

अकोला : या वर्षीच्या खरीप हंगामात वर्‍हाडातील पाच जिल्ह्यातील १६ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला असून,त्या दृष्टीने बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या विविध संस्था व शेतकर्‍यांकडील मिळून १३ लाख ३७ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. यामुळे शेतकर्‍यांनी काळ्याबाजारातून सोयाबीन खरेदी करण्याचे टाळावे.
अकोला जिल्ह्यात २ लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणीचा अंदाज आहे. त्याकरिता १ लाख ५० हजार क्िंवटल बियाणे अपेक्षित आहे. त्या तुलनेत १ लाख ८० हजार क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. यामध्ये शेतकर्‍यांकडील ५१ हजार क्विंटल, महाबीज ११ हजार, खासगी कंपन्यांकडून ६७ हजार, एपीएमसी, वखार महामंडळ व बुलडाण अर्बन यांच्याकडील ५१ हजार क्िंवटल बियाण्यांचा समावेश आहे. बुलडाणा जिल्ह्यात ३ लाख ६० हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणी केली जाण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने या सर्व संस्था व शेतकर्‍यांकडील मिळून जवळपास ४ लाख ३ हजार क्िंवटल बियाणे उपलब्ध असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. या जिल्ह्याला २.७० लाख क्िंवटल बियाणे अपेक्षित आहे. वाशिम जिल्‘ात २ लाख ७५ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी केली जाणार असल्याचा अंदाज आहे. या जिल्‘ाला एकूण २.०६ लाख क्विंटल बियाण्यांची गरज भासणार आहे. प्रत्यक्षात सर्व संस्था व शेतकर्‍यांकडील बियाणे बघितल्यास ते २ लाख ७१ हजार क्विंटल उपलब्ध आहे. अमरावती जिल्ह्यात ३ लाख ७३ हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणीचा अंदाज आहे. या क्षेत्रासाठी २.८० लाख क्विंटल बियाण्यांची गरज आहे. प्रत्यक्षात २ लाख १४ हजार क्िंवटल बियाणे उपलब्ध आहे. यवतमाळ जिल्‘ात ३ लाख ९२ हजार हेेक्टरवर सोयाबीन लागवड केली जाणार आहे. या क्षेत्रासाठी २.९४ लाख क्विंटल बियाण्यांची अपेक्षा आहे. प्रत्यक्षात २ लाख ६९ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध आहे.
दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ३३ हजार क्िंवटल बियाणे शिल्लक आहे. अकोला जिल्‘ात ३० हजार, वाशिम जिल्ह्यात ६५ हजार क्िंवटल बियाणे शिल्लक आहे. तर अमरावती ६६ व यवतमाळ जिल्ह्याला मात्र २५ हजार क्िंवटल बियाणे कमी पडणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

Web Title: Try not to fill the soybean seeds shortage! Available in the Amravati region, there are about one and a half million seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.