शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: “देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटले नाहीत, अजून उंच भरारी मारण्यासाठीचं बळ”: तृप्ती देसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 19:54 IST

Maharashtra Political Crisis: देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावरही राजकीय घडामोडींचा वेग कमी झालेला दिसत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून घोषित करत सर्वांनाच धक्का दिला. त्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचे आदेश दिल्याने राजकीय वर्तुळ अचंबित झाले. यानंतर यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, यातच आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देत, त्यांची बाजू घेतली आहे. 

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेसह ५० आमदारांना सोबत घेऊन भाजपचा हात धरत राज्यात सरकार स्थापन केले. मुख्यमंत्रिपदाची घोषणा करताना देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर आपण सत्तेबाहेर राहणार असे स्पष्ट केले. मात्र शपथविधीला काही मिनिटे राहिलेली असतानाच थेट भाजप पक्षश्रेष्ठी अमित शाह आणि जेपी. नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होतील, अशी घोषणा केली. अखेर पक्षाच्या आदेशामुळे फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले. यावरून महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोले लगावले. तृप्ती देसाई यांनी मात्र फडणवीस यांची बाजू घेतली आहे. 

देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटले नाहीत

तृप्ती देसाई यांनी याविषयी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. आपल्या पोस्टमध्ये तृप्ती देसाई म्हणतात की, देवेंद्रजींचे पंख छाटले गेले नाहीत, तर अजून उंच भरारी मारता यावी, यासाठी हा केलेला प्रयोग आहे‌. मुख्यमंत्री पदावर असल्यावर त्यांना नगरपालिका निवडणुकीत विशेष लक्ष देता येणार नाही, असे तृप्ती देसाई म्हणाल्या. 

दरम्यान, ३ आणि ४ जुलै रोजी नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. एकनाथ शिंदेंसोबतचे सर्व बंडखोर आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. यानंतर ते भाजपच्या नेत्यांसह ताज हॉटेलमध्ये राहणार असल्याचे सांगितले जात आहे. ४ जुलै रोजी शिंदे सरकार बहुमत चाचणीला सामोरे जाणार असल्याचे सांगितले जात आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळTrupti Desaiतृप्ती देसाईDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस