ट्रकची कारला धडक; एक ठार, पाच गंभीर
By Admin | Updated: May 8, 2017 19:59 IST2017-05-08T19:59:58+5:302017-05-08T19:59:58+5:30
पुणे-बंगलोर महामार्गावर उजळाईवाडी, साई गार्डनसमोर डाव्या बाजूने ओव्हरटेक करणाऱ्या भरधाव ट्रकने कारला जोराची धडक दिली.

ट्रकची कारला धडक; एक ठार, पाच गंभीर
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 8 - पुणे-बंगलोर महामार्गावर उजळाईवाडी, साई गार्डनसमोर डाव्या बाजूने ओव्हरटेक करणाऱ्या भरधाव ट्रकने कारला जोराची धडक दिली. त्यामध्ये कारमधील सहा जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी एकाचा सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. भास्कर बालशेट्टी (वय ५५, रा. चित्तूर, आंध्र प्रदेश) असे त्यांचे नाव आहे. हा अपघात सोमवारी सकाळी सातच्या सुमारास घडला.
याबाबतची अधिक माहिती अशी की, आंध्र प्रदेशातील कोंडामीहा-चित्तूर या गावात राहणारे बालशेट्टी कुटुंबीय कारमधून बंगलोरहून शिर्डीला देवदर्शनासाठी निघाले होते. सोमवारी सकाळी पुणे-बंगलोर महामार्गावर उजळाईवाडी, साई गार्डनसमोर येताच डाव्या बाजूने ओव्हरटेक करणाऱ्या भरधाव ट्रकने कारला जोराची धडक दिली. त्यामध्ये कार उलटून सहा जण गंभीर जखमी झाले. महामार्ग वाहतूक पोलिसांनी जखमींना तात्काळ सीपीआरमध्ये दाखल केले.
भास्कर बालशेट्टी यांच्या डोक्यासह छातीला गंभीर दुखापत झाली होती. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अन्य जखमी प्रवीण राजन (वय ३५), किरण बालशेट्टी (२८), गीतांजली बालशेट्टी (५०), स्वप्नप्रिया बालशेट्टी (३०, सर्व रा. आंध्र प्रदेश) यांच्यावर उपचार करून खासगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी गोकूळ शिरगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.