Tripura Violence: “महाराष्ट्रात दंगल पेटवण्यामागं भाजपाचं षडयंत्र; राज्यातील जनतेनं बळी पडू नये”

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 03:50 PM2021-11-13T15:50:18+5:302021-11-13T15:51:05+5:30

मुख्य मुद्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाकडून असे षडयंत्र केले जात आहे असा आरोप काँग्रेसनं केला आहे.

Tripura Violence: “BJP's conspiracy to provoke riots in Maharashtra Says Congress Nana Patole | Tripura Violence: “महाराष्ट्रात दंगल पेटवण्यामागं भाजपाचं षडयंत्र; राज्यातील जनतेनं बळी पडू नये”

Tripura Violence: “महाराष्ट्रात दंगल पेटवण्यामागं भाजपाचं षडयंत्र; राज्यातील जनतेनं बळी पडू नये”

Next

मुंबई - त्रिपुरात घडलेल्या घटनेचे पडसाद म्हणून महाराष्ट्र अमरावती, नांदेड, मालेगावसह काही भागात वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका लवकरच होत आहे. दंगली पेटवून निवडणुकीत त्याचा फायदा घेण्याचा भाजपाचा नेहमीप्रमाणे डाव आहे. म्हणूनच त्रिपुरा घटनेच्या आडून महाराष्ट्रात दंगली पेटवून त्यावर उत्तर प्रदेशात आपली राजकीय पोळी भाजण्याचे भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

यावेळी नाना पटोले(Congress Nana Patole) म्हणाले की, भाजपाच्या या षडयंत्राला राज्यातील जनतेने बळी पडू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये शांतता राखावी, काल आणि आज अमरावतीसह काही भागात घडलेल्या हिंसक घटनांचा तीव्र निषेध आहे. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांचे सरकार दोन वर्षापासून स्थिर असून भाजपाने(BJP) हे सरकार अस्थिर करण्यासाठी खूप प्रयत्न केले पण यात त्यांना यश आले नाही. महाराष्ट्रात अशांतता पसरवून सरकार पाडण्याचे सर्व प्रकारचे उद्योग झाले त्यात महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, चीनची घुसखोरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून देशभर भारतीय जनता पक्षाच्याविरोधात तीव्र असंतोष आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच या मुख्य मुद्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाकडून असे षडयंत्र केले जात आहे. हिंसक कारवाया करणाऱ्यांवर व अफवा पसरवणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी. समाजातील दोन घटकांमध्ये तेढ निर्माण करुन त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचे राजकारण करणे हा भारतीय जनता पक्षाचा इतिहास राहिला आहे. देशातील ज्वलंत प्रश्नावर जनतेच्या आक्राशोला त्यांना तोंड देता येत नाही. तर जनतेमध्ये भाजपा व मोदी सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे. या असंतोषाचा फटका उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील आगामी विधानसभेच्या निवडणुकीत बसू नये म्हणून दंगली पेटवून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपाचा डाव आहे. महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्षाचा हा कुटील हेतू ओळखून षडयंत्राला बळी पडू नये, राज्यात शांतता राखावी, असं आवाहन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

Web Title: Tripura Violence: “BJP's conspiracy to provoke riots in Maharashtra Says Congress Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.