शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

गणवेशधारी सेवांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला : राज्य मंडळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 20:38 IST

राज्यभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या कलचाचणीचा अहवाल यंदा खूपच लवकर परीक्षा सुरू असतानाच जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदहावीच्या विद्यार्थ्यांचा कलचाचणी अहवाल जाहीरललित कला व वाणिज्य शाखांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीयकल चाचणी अहवाल महाकरिअर मित्रा या पोर्टलवरून ऑनलाईन प्राप्त

पुणे : राज्यभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे ते जाणून घेण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या कलचाचणीचा अहवाल शुक्रवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. यंदा पहिल्यांदाच गणवेशधारी सेवांकडे (१७.८३ टक्के) विद्यार्थ्यांचा अधिक कल असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर दरवर्षी हिट ठरणाऱ्या ललित कला (१८.१७ टक्के) व वाणिज्य शाखांमध्ये (१६.१७ टक्के) करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे.राज्यभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या कलचाचणीचा अहवाल यंदा खूपच लवकर परीक्षा सुरू असतानाच जाहीर करण्यात आला आहे. त्यांना शनिवार, दि. १६ मार्च २०१९ रोजी सकाळी ११ वाजता महाकरिअर मित्रा डॉट इन या वेबसाईटवर हा अहवाल उपलब्ध होणार आहे. राज्यभरातील २२ हजार ११२ शाळांमधील दहावीच्या १६ लाख १३ हजार ६०९ विद्यार्थ्यांनी ही कलचाचणी दिली होती. महाविद्यालयात प्रवेश करताना त्यांना शैक्षणिक भविष्याची दिशा निश्चित करता यावी या हेतून २०१६ पासून राज्य मंडळाकडून दहावीला प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेतली जात आहे.दरवर्षी ललित कला, वाणिज्य शाखांमध्ये करिअर करण्याकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल असल्याचे दिसून येत होते. यंदा त्यामध्ये एक मोठा बदल दिसून येत असून गणवेशधारी सेवांकडे (पोलीस, लष्कर, निमलष्करी दल) विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. ललित शाखांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांची संख्या सर्वाधिकच आहे मात्र गणवेशधारी सेवांकडे वाढलेला कल यंदा लक्षणीय आहे. गणवेशधारी सेवेत जाऊ इच्छिणाऱ्यांची संख्या यंदा १७.८३ टक्के इतकी आहे. ललित शाखेकडे १८.१७ टक्के, वाणिज्य शाखांकडे १६.९९ टक्के, कृषीक्षेत्राकडे १४.११ टक्के, कला व मानव्यविद्या शाखेकडे १३.४१ टक्के, आरोग्य व जैविक विज्ञान शाखोकडे ११.२४ टक्के, तांत्रिक शाखांकडे ९.०६ टक्के विद्यार्थ्यांचा कल दिसून येत आहे.  विद्यार्थी त्यांच्या एसएससी बोर्ड क्रमांकाच्या आधारे त्यांचा कल चाचणी अहवाल महाकरिअर मित्रा या पोर्टलवरून ऑनलाईन प्राप्त करू शकतात. त्याचबरोबर त्यांचा कल असलेल्या क्षेत्राविषयी माहिती सांगणारा व्हिडीओ त्यांना पाहता येऊ शकणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रनिहाय माहितीपर व्हिडीओ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या आवडीच्या कलक्षेत्रानुसार त्यांच्या जिल्हयातील उपलब्ध अभ्यासक्रमांचा शोध विद्यार्थ्यांना या पोर्टलव्दारे घेता येणार आहे. याठिकाणी ८० हजारांहून अधिक शासनमान्य अभ्यासक्रमांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

____________________________________________ 

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाGovernmentसरकारStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र