शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन मंत्री अनिल परबांसह अधिकाऱ्यांना दिलासा; RTO भ्रष्टाचाराच्या आरोपातून मिळाली क्लीनचीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 23:36 IST

आरटीओ' भ्रष्टाचार तक्रारीचा बार 'फुसका', 27 मे पासून याप्रकरणी चौकशीला सुरुवात झाली होती. दोनदा मिळालेल्या मुदतवाढीनंतर गुन्हे शाखेने पंधरवड्यात चौकशी पूर्ण केली आहे.

ठळक मुद्देपांडेय यांनी सोपविला अंतिम अहवाल: चौकशीअंती शहरात गुन्हा घडला नसल्याचे उघडतक्रारदार पाटील यांच्याकडूनही प्रारंभी हवे तसे सहकार्य पोलिसांना मिळत नव्हतेराज्याच्या मंत्र्यांपासून उच्चपदस्थ अधिकारी वर्गापर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप करणारी तक्रार होती

नाशिक : राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात भ्रष्टाचार व अनागोंदी कारभार होत असल्याच्या प्राप्त झालेल्या तक्रारीने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या तक्रारीत परिवहन मंत्री अनिल परब यांच्यापासून विविध सचिव आणि आरटीओचे वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. पंढरवाड्याच्या नाशिक पोलिसांच्या चौकशीअंती याबाबतचा कुठल्याही प्रकारचा गुन्हा शहर आयुक्तालयाच्या हद्दीत घडला नसल्याचे प्रशासनाने मंगळवारी (दि.22) स्पष्ट केले आहे.

राज्याच्या मंत्र्यांपासून उच्चपदस्थ अधिकारीवर्गांपर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप करणारी तक्रार आरटीओचे निलंबित मोटार निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीची गंभीरपणे दखल घेत पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करत सखोल चौकशीचे आदेश दिले होते. 27 मे पासून याप्रकरणी चौकशीला सुरुवात झाली होती. दोनदा मिळालेल्या मुदतवाढीनंतर गुन्हे शाखेने पंधरवड्यात चौकशी पूर्ण केली आहे. या दरम्यान राज्याच्या अवर सचिव, उपसचिवांपासून नाशिक, धुळे, जळगाव आदी जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, आरटीओची कामे करणारे खासगी व्यक्ती आणि तक्रारदार असे सुमारे 35पेक्षा अधिक लोकांची कसून चौकशी करण्यात आली. सुरुवातीपासून यामध्ये क्लिष्टता, गुंतागुंत आढळून येत होती.

तक्रारदार पाटील यांच्याकडूनही प्रारंभी हवे तसे सहकार्य पोलिसांना मिळत नव्हते. मात्र दुसऱ्या दिवसापासून पाटील यांनी त्यांच्याकडे आरोपांशी निगडित विविध पुरावे सादर करण्यास सुरुवात केली होती. चौकशी लांबणीवर गेल्याने यामधून नेमके काय बाहेर येणार? पोलीस आयुक्त काय अहवाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. चौकशी सत्र गेल्या शनिवारी (दि. १२) समाप्त झाले होते.

गुन्हे शाखेच्या चौकशी अहवालाची पडताळणी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्याकडून बारकाईने करण्यात येत होती. त्यांनी दहा दिवसांत चौकशी अहवाल, तक्रारदाराने दिलेले पुरावे यांची शहानिशा केली.   या तक्रारीत करण्यात आलेल्या आरोपानुसार नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडला नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचे पांडेय यांनी स्पष्ट केले. तक्रारीतील अन्य तथ्यांबाबतचा सविस्तर अहवाल पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला असल्याचे पांडेय यांनी सांगितले.

टॅग्स :Anil Parabअनिल परबstate transportएसटीPoliceपोलिस