शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेतील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

By admin | Updated: August 23, 2016 01:15 IST

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. चार अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

पुणे : महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. चार अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. सरकारकडून पालिकेच्या सेवेत आलेल्या अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पदांवर घेतले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी सर्वसाधारण सभेत केला होता. त्याला पुष्टी मिळेल अशाच बदल्या झाल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त मंगेश जोशी बदलीच्या ठिकाणी वर्षभराने रुजू झाल्यानंतर ते पद रिक्त झाले होते. त्यावर पालिकेच्या मूळ सेवेतील अधिकाऱ्याची नियुक्ती होणे अपेक्षित असताना त्या पदाचा अतिरिक्त कार्यभार मिळकत कर विभागाचे उपायुक्त सुहास मापारी यांच्याकडे देण्यात आला आहे. ते सरकारकडूनच पालिकेच्या सेवेत आले आहेत.दक्षता विभागाचा अतिरिक्त कार्यभार प्रकाश बोरसे यांच्याकडे देण्यात आला आहे. सहायक आयुक्त उमेश माळी यांच्याकडे सहकारनगर क्षेत्रीय कार्यालबरोबरच समाजकल्याण विभाग देण्यात आला आहे. सहायक आयुक्त माधव देशपांडे यांच्याकडे कोंढवा-वानवडी क्षेत्रीय कार्यालयासमवेत झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग आहे. (प्रतिनिधी)>संध्या गागरे यांच्याकडे अतिक्रमण विभाग सहआयुक्त विलास कानडे यांच्याकडे भूसंपादन व भूव्यवस्थापन विभाग देण्यात आला आहे. त्यांच्याकडील अतिक्रमण विभागाची जबाबदारी सहायक आयुक्त संध्या गागरे यांच्याकडे आली आहे. सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांच्याकडे स्थानिक संस्था कर विभागाबरोबरच झोन ३ चीही जबाबदारी देण्यात आली आहे. तर, उपायुक्त सुनील केसरी यांच्याकडे झोन १, सहआयुक्त सुरेश जगताप यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापनाबरोबरच झोन ४ ची जबाबदारी देण्यात आली आहे.