शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

ठाण्यासह मीरा-भाईंदर, उल्हासनगर, नवी मुंबईच्या महापालिका आयुक्तांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 05:39 IST

सध्याचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ हे नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. बांगर हे आतापर्यंत नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त होते.

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी नवी मुंबई, उल्हासनगर, मीरा-भाईंदर आणि ठाणे महापालिका आयुक्तांची बदली केली. ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या जागी डॉ. विपीन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अभिजित बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ हे नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. बांगर हे आतापर्यंत नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त होते.गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड आता मीरा-भार्इंदर महापालिकेचे नवे आयुक्त असतील. आतापर्यंत तेथे आयुक्त असलेले चंद्रकांत डांगे हे नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम.आर. दयानिधी यांची नियुक्ती उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. तेथील आयुक्त समीर उन्हाळे नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. मुंबई पोलीस दलात सहआयुक्त (गुन्हे) असलेले डॉ. संतोष रस्तोगी यांची बदली दिल्लीतील महाराष्ट्र सदनात अतिरिक्त निवासी आयुक्त या पदावर करण्यात आली आहे.ठाणे महानगरपालिकेचेतत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल तडकाफडकी रजेवर गेले होते. त्यानंतर त्यांच्या जागी विजय सिंघल यांचीठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागली होती. त्यात अवघ्या तीन महिन्यांत मंगळवारी त्यांची बदली झाली. आयुक्त विजय सिंघल यांच्या बदलीचे वृत्त शहरात पसरताच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी ठरल्यामुळेत्यांची बदली झाल्याची चर्चा शहरात सर्वत्र सुरू झाली.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकulhasnagarउल्हासनगर