राज्यात २८ 'आयएफएस' अधिका-यांच्या बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 21:15 IST2018-08-14T21:15:09+5:302018-08-14T21:15:34+5:30
राज्याच्या वनविभागात भारतीय वनसेवेच्या २८ आयएफएस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी धडकले. महसूल व वनविभागाने पदोन्नती व बदलीने होणा-या पदस्थापनेचे आदेश निर्गमित केले आहेत.

राज्यात २८ 'आयएफएस' अधिका-यांच्या बदल्या
अमरावती : राज्याच्या वनविभागात भारतीय वनसेवेच्या २८ आयएफएस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी धडकले. महसूल व वनविभागाने पदोन्नती व बदलीने होणा-या पदस्थापनेचे आदेश निर्गमित केले आहेत.
यात अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक ए.एन. त्रिपाठी (कार्य आयोजना, पुणे), मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी (एपीसीसीएफ, मुंबई), महाराष्टÑ लोकसेवा आयोग सचिव प्रदीप कुमार (वनविकास, नागपूर), मुख्य वनसंरक्षक बी. एस. हुडा (एपीसीसीएफ, नागपूर), मुख्य वनसंरक्षक एस.व्ही. रामाराव (चंद्रपूर, प्रादेशिक), मुख्य वनसंरक्षक व्ही. एस. शेळके (नाशिक, प्रादेशिक), मुख्य वनसंरक्षक मुकुल त्रिवेदी (नागपूर, वनविनियम), मीरा अय्यर (मानव संसाधन विकास, नागपूर), वनसंरक्षक एन. आर. प्रवीण (ताडोबा अंधारी-व्याघ्र प्रकल्प), उपवनसंरक्षक जी. पी. नरवणे (मध्य चांदा, प्रादेशिक), गजेंद्र हिरे (ताडोबा अंधारी-व्याघ्र प्रकल्प), भरतसिंह हाडा (सातारा, प्रादेशिक), ए. एम. अंजनकर (नाशिक, वन्यजीव), एच. जी. धुमाळ (कोल्हापूर, प्रादेशिक), प्रभुदास शुक्ला (नागपूर, प्रादेशिक), जी. मल्लिकार्जुन (नाशिक कार्य आयोजना), पी.टी. मोरणकर (यावल, प्रादेशिक), एस. एस. दहीवले (अमरावती कार्य आयोजना), एन.ए.विवरेकर (वडसा, प्रादेशिक), व्ही.एम. गोडबोले (नागपूर भूमिअभिलेख), व्ही. एन. हिंगे (बल्लारशाह), सी. एल. धुमाळ (कुंडल, विकास प्रबोधिनी), व्ही. बी. जावळेकर (अमरावती, प्रादेशिक), व्ही.जे. भिसे (डहाणू, प्रादेशिक), एन.एस. लडकर (ताडोबा अंधारी-व्याघ्र प्रकल्प), किशोर मानकर (नागपूर संसाधन उपयोग), व्ही. टी. घुले (शहापूर, प्रादेशिक), डी. पी. निकम (औरंगाबाद कार्य आयोजना) यांचा समावेश आहे.