शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

राज्यातील ११ अपर महासंचालकांच्या बदल्या; ठाण्याच्या आयुक्तपदी विवेक फणसाळकर, नवी मुंबईला संजय कुमार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 2:47 AM

अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अखेर सोमवारी मुहूर्त मिळाला. ठाण्याच्या आयुक्तपदाची धुरा एसीबीचे प्रभारी विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

मुंबई : अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अखेर सोमवारी मुहूर्त मिळाला. ठाण्याच्या आयुक्तपदाची धुरा एसीबीचे प्रभारी विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ठाण्याचे आयुक्त परमबीर सिंह यांची पोलीस मुख्यालयातील कायदा व सुव्यवस्थेच्या अपर महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे. एकूण अकरा अपर महासंचालक दर्जाच्या अधिकाºयांचे खांदेपालट करण्यात आले असून सीआयडीचे प्रमुख संजय कुमार यांची नवी मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून तेथील हेमंत नागराळे यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यातआली आहे.पुण्याच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांची राज्य पोलीस वाहतूक महामार्गच्या प्रमुखपदी बदली करण्यात आली असून त्यांची धुरा नागपूरचे आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी राज्य वाहतूक महामार्गचे अपर महासंचालक आर. के. पद्मनाभन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गृह विभागाने सोमवारी दुपारी बदल्यांचे आदेश जारी केले असून संबंधितांना तातडीने नवीन पदावर रुजू होण्याची सूचना करण्यात आली आहे.शुक्रवारी रात्री उशिरा १२० वरिष्ठ अधिकाºयांच्या बढत्या व बदल्यांचे आदेश जारी झाल्यानंतर प्रमुख आयुक्तालयातील आयुक्त व अन्य अपर महासंचालक दर्जाच्या अधिकाºयांच्या बदल्या केव्हा होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ‘लोकमत’मध्ये सोमवारी याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. सव्वातीन वर्षांपासून ठाण्यात कार्यरत असलेले परमबीर सिंह यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे महासंचालक कार्यालयात कायदा व सुव्यवस्था विभागाचे प्रमुख पद सोपविण्यात आले. गेल्या आठ महिन्यांपासून त्याचा अतिरिक्त कार्यभार बिपीन बिहारी यांच्याकडे होता. परमबीर सिंह यांचा पदभार एसीबीचे प्रभारी प्रमुख विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यांच्या जागी गृह विभागातील प्रधान सचिव रजनीश सेठ यांची बदली करण्यात आली आहे. सेठ यांच्या जागेवर वैधमापन शास्त्र विभागाचे नियंत्रक अमिताभ गुप्ता यांची बदली करण्यात आली आहे. नागपूरचे डॉ. व्यंकटेशम यांच्यावर पुण्याच्या आयुक्तपदाची धुरा सोपविली असून त्यांचा पदभार कारागृहाचे महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे देण्यात आला आहे.सीआयडीचे प्रमुख संजय कुमार यांची नवी मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा पदभार सीआयडीच्या गुन्हे अभिलेख विभागाचे अपर महासंचालक संजीव सिंघल यांच्याकडे दिला आहे. तर हेमंत नागराळे यांची पोलीस महासंचालक कार्यालयात सामग्री व तरतूदच्या अपर महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे.

टॅग्स :Policeपोलिस