आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना मिळाला मुहूर्त; ३८ अधिकाऱ्यांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 06:43 AM2022-04-21T06:43:48+5:302022-04-21T06:45:33+5:30

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे प्रमुख सहआयुक्त मिलिंद भारांबे यांच्या खांद्यावर राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी देत विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Transfer of IPS officers in Maharashtra | आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना मिळाला मुहूर्त; ३८ अधिकाऱ्यांच्या बदल्या

आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना मिळाला मुहूर्त; ३८ अधिकाऱ्यांच्या बदल्या

googlenewsNext

मुंबई : राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्यांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. गृहमंत्रालयाने बुधवारी सायंकाळी ३८ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आणि नवीन नियुक्त्यांचे आदेश जारी केले. 

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे प्रमुख सहआयुक्त मिलिंद भारांबे यांच्या खांद्यावर राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी देत विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर, भारांबे यांच्या जागी सुहास वारके हे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहआयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. दुसरीकडे, धडक कारवाईमुळे चर्चेत असलेल्या नाशिक शहरचे आयुक्त दीपक पांडे यांची राज्य पोलिसांच्या महिला अत्याचार प्रतिबंधक विभागात विशेष पोलीस महानिरीक्षक पदी नेमणूक झाली आहे. 
 

Web Title: Transfer of IPS officers in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.