शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गद्दारांना सर्वच गद्दार दिसतात, काँग्रेसची खासदार प्रतापराव जाधवांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 16:58 IST

Congress criticizes MP Prataprao Jadhav: शिवसेनेतून फुटून शिंदे गटात सहभागी झालेले बुलढाण्याचे फुटीर खासदार प्रतापराव जाधव यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचा मोठा गट महायुतीत सामील होणार असे वक्तव्य केले आहे, या दाव्यावर काँग्रेसने घणाघाती टीका केली आहे.

मुंबई - शिवसेनेतून फुटून शिंदे गटात सहभागी झालेले बुलढाण्याचे फुटीर खासदार प्रतापराव जाधव यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचा मोठा गट महायुतीत सामील होणार असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या बेताल वक्तव्याचा समाचार घेत, गद्दारांना सर्वच गद्दार दिसतात, पण कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, अशी घणाघाती टीका  काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना लोंढे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेशी दगा फटका करून काही लोकांनी वेगळा गट तयार केला. या फुटीरांना महाराष्ट्रातील जनता गद्दार म्हणून ओळखते आणि संबोधते. जातील तिथे या गद्दारांना जनतेच्या संतापाचा सामना करावा लागतो त्यामुळे ते सैरभैर झाले आहे. आपण केलेल्या गद्दारीचे पाप पुसता येत नसल्याने हताश आणि निराश झालेले हे फुटीर लोक दररोज काँग्रेस पक्ष फुटणार अशा वावड्या उठवत असतात. काँग्रेस पक्षात आपल्या विचारधारेशी आणि पक्षनेतृत्वाशी इमानदार असणारे प्रामाणिक नेते आणि कार्यकर्ते आहेत. त्यामुळे अशा फुटीर कावळ्यांनी कितीही शाप दिले तरी काही फरक पडणार नाही. राज्यातील जनता सुज्ञ असून आगामी निवडणुकीत ती गद्दारांना त्यांची जागा दाखवेल असा टोला लोंढे यांनी लगावला.

टॅग्स :Prataprao Jadhavप्रतावराव जाधवShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस