Train movement on Mumbai-Pune line on Central Railway route affected | मुंबई पुणे रेल्वे मार्गावर मंक्की हिलजवळ पुन्हा दरड कोसळली, मिडल व डाऊन लाईन बंद
मुंबई पुणे रेल्वे मार्गावर मंक्की हिलजवळ पुन्हा दरड कोसळली, मिडल व डाऊन लाईन बंद

 लोणावळा : मुंबईपुणे लोहमार्गावर खंडाळा घाटातील मंक्की हिल याठिकाणी आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मोठी दरड पडल्याने मिडल व डाऊन लेन बंद झाल्याने पुण्याकडे येणार्‍या सर्व रेल्वे गाड्या थांबविण्यात आल्या आहेत. रेल्वे किमी 115 जवळ ही घटना घडली.
लोणावळा व खंडाळा परिसरात आज दुपारपासून जोराचा पाऊस सुरु आहे. पावसामुळे दुपारी दोनच्या सुमारास मंक्की हिलजवळ लहान स्वरुपाची दरड कोसळली. माती व दगड बाजुला करुन दोन गाड्या सोडल्यानंतर दुपारी तिन वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठ्या प्रमाणात दरड मिडल लाईनवर कोसळली, यावेळी काही दगड डाऊन लाईनवर गेल्याने या दोन्ही लेन वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. मार्गावर आलेले दगड मोठे असल्याने ते ब्लास्ट करुन फोडण्याचे काम सुरु असून तदनंतर रेल्वे सेवा सुरु होणार आहे. दरम्यान पुण्याकडे सर्व रेल्वे थांबविण्यात आल्या आहेत.


Web Title: Train movement on Mumbai-Pune line on Central Railway route affected
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.