कसारा घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प
By Admin | Updated: July 16, 2017 14:54 IST2017-07-16T13:48:28+5:302017-07-16T14:54:42+5:30
कसारा घाटात आज लतीफवाडी शिवारात रस्त्यावर दरड कोसळल्याने नाशिककडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

कसारा घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प
>ऑनलाइन लोकमत
घोटी (नाशिक), दि. 16 - कसारा घाटात आज लतीफवाडी शिवारात रस्त्यावर दरड कोसळल्याने नाशिककडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. ही दरड हटविण्याचे युद्ध पातळीवर काम हाती घेण्यात आले असून,वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

कसारा घाटातील जुन्या रस्त्यावर ही दरड कोसळली आहे. यामुळे अवजड वाहणे घाटतच अडकून पडली असून लहान वाहने घाटनदेवी मार्गे वळविण्यात आली आहेत.