शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
4
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
5
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
6
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
7
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
8
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
9
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
10
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
11
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
13
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
14
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
15
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
16
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
17
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
18
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
19
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
20
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर

'टोरेस'ची राज्यभर फस‌वणूक साखळी; आर्थिक गुन्हे शाखेचे सहा ठिकाणी सर्च ऑपरेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 07:47 IST

घर, कार्यालयांची झाडाझडती, कोट्यवधी रुपये जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : टोरेसचे फसवणूक जाळे राज्यभरात पसरल्याचे स्पष्ट होत आहे. कोल्हापूरच्या ८६ जणांनी मुंबई पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली आहे. दुसरीकडे गुरुवारी सकाळपासून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून मुंबईसह ठाण्यात सर्च ऑपरेशन राबवून रोख रकमेसह कागदपत्रे, लॅपटॉप,  असा ऐवज जप्त करण्यास सुरुवात केली. 

कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या एका महिला एजंटने टोरेसच्या ऑफरमध्ये दहा हजार रुपये गुंतवले. नंतर तिने कोल्हापूरमधील नातेवाइक आणि मित्रमंडळीसह ८६ जणांची साखळी तयार करून त्यांनाही गुंतवणूक करण्यास भाग पाडले. तेही तीन दिवसांपासून शिवाजी पार्क पोलिस ठाण्याबाहेर तळ ठोकून आहेत. राज्याच्या विविध भागांतील नागरिक तक्रारी घेऊन येत असल्याने टोरेसने राज्यभरातील गुंतवणूकदारांना गंडा घातल्याचे स्पष्ट होत आहे.

घर, कार्यालयांची झाडाझडती

  • मुंबई पोलिसांनी गुरुवारी सकाळपासून दादर, गिरगाव, ग्रँट रोड, एन एन जोशी येथील टोरेसच्या कार्यालयासह आरोपींच्या कुलाबा आणि डोंबिवलीतील घरांतही सर्च ऑपरेशन राबवले. 
  • अटकेतील जनरल मॅनेजर तानिया कसातोवा, भारतीय वंशाची रशियन नागरिक असलेली स्टोअर मॅनेजर व्हॅलेंटिना गणेश कुमार यांच्या डोंबिवलीतील घरांची झडती घेण्यात आली. तानिया (५२) हिच्या घरातून रोकड जप्त करण्यात आली आहे. सलग दुसऱ्या दिवशी अभिषेक गुप्ताकडे चौकशी सुरू आहे. या कारवाईत दोन ते तीन कोटींची रोकड जप्त केल्याचे स्पष्ट होत आहे.

नवी मुंबईत तक्रारदारांची संख्या दोनशेहून अधिक; एपीएमसी, आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव

  • गुंतवणुकीच्या माध्यमातून फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या ‘टोरेस’विरोधात दोनशेच्या वर तक्रारदारांनी पोलिसांशी संपर्क साधला आहे. एपीएमसी व आर्थिक गुन्हे शाखेकडे गुंतवणूकदार धाव घेत आहेत. येत्या काळात तक्रारदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच फसवणूक झालेल्या रकमेचा आकडाही वाढणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
  • गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात टोरेसच्याआडून फसवी योजना चालवणाऱ्या प्लॅटिनम हर्न कंपनीच्या प्रमुखांवर गुन्हा दाखल झाला आहे. प्रकार उघडकीस आल्यापासून अद्यापपर्यंत तीन दिवसांत दोनशेहून अधिक तक्रारदार समोर आले आहेत. आर्थिक गुन्हे शाखा व एपीएमसी पोलिस यांच्याकडून त्यांच्या तक्रारी नोंद करून या प्रकरणात एकूण किती कोटींची फसवणूक झाली आहे, याचा शोध घेतला जात आहे.
  • नागरिकांना गळाला लावण्यासाठी टोरेस ज्वेलर्सचा आधार घेतला होता. प्रथम नागरिकांना दागिन्यांची माहिती देऊन ते खरेदी करणाऱ्यांना गुंतवणुकीच्या योजना सांगून नफ्याचे आमिष दाखवले जात होते. त्यासाठी ठिकठिकाणी सेमिनारसुद्धा घेतले जात होते. गुंतवणूक करणाऱ्यांचा आकडा हजारोंच्या घरात असण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत तीन कोटीहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे. रोख रक्कमेसह मोझानाईट भासवून वितरित केलेले खडेही हाती लागले. टोरेसने घर, वाहने आणि अन्य महागड्या वस्तू बक्षीस म्हणून जाहीर केल्या होत्या. त्याबाबतची कागदपत्रेही सापडली. या कागदपत्रांवरून कंपनीने आतापर्यंत १५ वाहने बक्षीस म्हणून वाटली. टोरेसच्या शोरुममधून खडे हस्तगत करण्यात आले आहेत.  - संग्रामसिंग निशाणदार, पोलिस उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा

टॅग्स :torres scamटोरेस घोटाळाraidधाडPoliceपोलिसfraudधोकेबाजी