शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘एमएसआरडीसी’च्या रस्त्यांवर १ एप्रिलपासून ‘फास्टॅग’द्वारेच टोल; रोखीने टोल भरणाऱ्यांकडून दुप्पट पैसे घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 12:13 IST

वाहनचालकांनी आर्थिक भुर्दंडापासून वाचण्यासाठी फास्टॅग स्टीकर खरेदी करावेत, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अखत्यारीतील टोल नाक्यांवर १ एप्रिलपासून ‘फास्टॅग’द्वारेच वाहनांना टोल भरावा लागणार आहे. रोखीने अथवा क्यूआर कोड आदी माध्यमांतून टोल भरणाऱ्यांकडून नियमित शुल्काच्या दुप्पट रक्कम आकारण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार एमएसआरडीसीकडून टोल नाक्यांवरील सर्व मार्गिका फास्टॅग मार्गिकेत रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  सद्य:स्थितीत ‘एमएसआरडीसी’कडून फास्टॅगच्या जोडीला हायब्रीड पद्धतीनेही टोल वसुली केली जाते. त्यामध्ये रोख, स्मार्ट कार्ड, पीओएस, डेबिट कार्ड, क्यूआर कोड आदींचा समावेश आहे. त्यामुळे टोल नाक्यांवर फास्टॅग मार्गिकांसोबतच दोन मार्गिका या हायब्रीड टोल वसुलीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. मात्र १ एप्रिलपासून या हायब्रीड मार्गिका बंद केल्या जाणार आहेत. त्यामुळे एमएसआरडीसीमार्फत टोल वसुली होणाऱ्या नऊ रस्ते प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्व टोल नाक्यांवर केवळ फास्टॅगमार्फतच टोल वसुली होईल. त्यामुळे हायब्रीड मार्गिका ३१ मार्चला रात्री १२ वाजेपासून बंद केल्या जाणार आहेत, अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून दुप्पट शुल्क आकारले जाणार आहे. वाहनचालकांनी आर्थिक भुर्दंडापासून वाचण्यासाठी फास्टॅग स्टीकर खरेदी करावेत, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

सध्याचे फास्टॅगद्वारे टोलभरणा प्रमाण८५-९०% सद्य:स्थितीत एमएसआरडीसीच्या टोल नाक्यांवरून प्रवास करणाऱ्या वाहनांपैकी जवळपास ८५ ते ९० टक्के वाहनांकडून फास्टॅगद्वारे टोल भरला जातो. 

या टोल नाक्यांवर फास्टॅग मस्ट१. वांद्रे वरळी सागरी सेतू२. मुंबई पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबई पुणे जुना मार्ग३. मुंबई प्रवेशाद्वारावरील ५ टोल नाके४. समृद्धी महामार्गावरील २३ टोल नाके५. नागपूर शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील ५ टोल नाके६. सोलापूर शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील ४ टोल नाके७. संभाजीनगर शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील ३ टोल नाके८. काटोल बायपास९. चिमुर वरोरा वणी 

टॅग्स :Fastagफास्टॅगtollplazaटोलनाकाGovernmentसरकार