शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

टोल पूर्णपणे बंद होणं शक्य नाही - गडकरी

By admin | Updated: May 21, 2015 12:18 IST

निवडणुकीदरम्यान टोल बंद करण्याचे आश्वासन देणा-या नितीन गडकरी यांनी 'टोल पूर्णपणे बंद होऊ शकत नाही' असे सांगत या मुद्यावरून चक्क यू-टर्न घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २१ - निवडणुकीदरम्यान टोल बंद करण्याचे आश्वासन देणा-या नितीन गडकरी यांनी 'टोल पूर्णपणे बंद होऊ शकत नाही' असे सांगत या मुद्यावरून चक्क यू-टर्न घेतला आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या गडकरींनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केल्याने सरकारने घूमजाव केल्याचे स्पष्ट झाले आहे.

'जनतेला चांगले रस्त हवे असतील तर टोल राहणारच' असे सांगत टोल पूर्णपणे बंद होणे शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. याच गडकरींनी विधानसभा निवडणुक प्रचारादरम्यान 'आपण टोलचा खेळ सुरू केला होता आणि आता आपणच तो बंद करू' असे आश्वासन देत जनतेला गाजर दाखवलं होतंं. मात्र सरकार सत्तेवर येऊन अवघे वर्ष पूर्ण होते न होते तोच त्यांनी आपल्या विधानावरून पलटी मारली आहे.

भाजपात लोकशाही आहे

केंद्रात मोदी, अमित शाह आणि जेटली हे तिघेच सरकार चालवत आहेत, बाकीच्या ज्येष्ठ मंत्र्यांचे मत विचारात घेतले जात नाही, असे सरकारवर होत असलेले आरोप चुकीचे असून भाजपामध्ये लोकशाहीच आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. भाजपात फक्त तिघांचेच सरकार नाही, पंतप्रधान मंत्र्यांशी सविस्तर चर्चा करून मगच निर्णय घेतात, असेही त्यांनी सांगितले.