बारावीची आजची सायकॉलॉजी परीक्षा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 09:05 IST2024-03-27T09:05:08+5:302024-03-27T09:05:34+5:30

आदल्या दिवशी अचानक परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थी गडबडून गेले आहेत.

Today's psychology exam of class 12 is cancelled | बारावीची आजची सायकॉलॉजी परीक्षा रद्द

बारावीची आजची सायकॉलॉजी परीक्षा रद्द

मुंबई :  एका परीक्षा केंद्रावरील प्रश्नपत्रिकेचा गठ्ठा गायब झाल्याचे निदर्शनास आल्याने दि कौन्सिल फॉर दि इंडियन स्कुल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सने (सीआयएससीई) २७ मार्चला होणारी बारावीची सायकॉलॉजी विषयाची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा आता ४ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता होणार आहे. आदल्या दिवशी अचानक परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थी गडबडून गेले आहेत.

अशा पद्धतीने परीक्षा अचानक पुढे ढकलण्याचा हा दुसरा प्रकार आहे. याआधी बारावीची २६ फेब्रुवारीला होणारी रसायनशास्त्र विषयाची परीक्षा रद्द करण्यात आली होती. ती २१ मार्चला घेण्यात आ ली. त्यावेळीही पेपरफुटीची जोरदार चर्चा होती. त्यानंतर आता सायकॉलॉजी विषयाची परीक्षा रद्द केली आहे.

Web Title: Today's psychology exam of class 12 is cancelled

टॅग्स :examपरीक्षा