शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

आरटीई प्रवेशाची आज पहिली लॉटरी

By admin | Updated: March 4, 2017 01:16 IST

पुणे जिल्ह्यातील जागांसाठी ३७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत

पिंपरी : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राबविल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात असून, पुणे जिल्ह्यातील जागांसाठी ३७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच, शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेशप्रकियेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, प्रवेशाची पहिली लॉटरी ४ मार्च रोजी काढली जाणार आहे.शालेय शिक्षण विभागातर्फे फेब्रुवारी महिन्यात आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू केली होती. शासनाच्या संकेतस्थळावर २ मार्चपर्यंत आॅनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरण्याची मुदत होती. त्यामुळे सर्व जिल्ह्यांमधील आरटीईच्या जागांसाठी पालकांनी पाल्यांचे आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरले.काही जिल्ह्यांमधून आरटीई प्रवेशास चांगला प्रतिसाद मिळत असला तरी कोल्हापूर, नंदुरबार, परभणी, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांतून अल्प प्रतिसाद मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील ८४९ शाळांमधील १५,६९३ जागांसाठी ३७,२०८ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक अर्ज आल्याने प्रवेशासाठी ५ वेळा लॉटरी काढली जाणार आहे. पुणे जिल्ह्यापाठोपाठ नागपूर जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. नागपूरमध्ये आरटीईच्या ७,०९० जागांसाठी २३,५४७ अर्ज आले. मुंबईमध्ये ८,५९३ जागांसाठी ९,४६३, अमरावतीमध्ये २,९२० जागांसाठी ५,१३३, औरंगाबादमध्ये ५,५५१ जागांसाठी ८,४३५, नाशिकमध्ये ६,३८० जागांसाठी ६,५५२ आणि यवतमाळमध्ये १,७४१ जागांसाठी ३,१३६ अर्ज आले आहेत. आरटीई प्रवेशप्रक्रिया सर्व जिल्ह्यांत सुरू आहे; परंतु पालकांमध्ये जागृती न झाल्याने अनेक जिल्ह्यांत अद्याप ८०० ते ९०० अर्ज प्राप्त झाले आहेत.जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख म्हणाले, की विभागातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड पालिका परिसर व ग्रामीण भागातील इंग्रजी माध्यम शाळांमधील आरटीई जागांसाठी २ मार्चपर्यंत आॅनलाईन प्रवेश अर्ज स्वीकारण्यात आले. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अर्ज आले. (प्रतिनिधी)>आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना कायद्यानुसार प्रवेश देणे बंधनकारक आहे. ज्या शाळा प्रवेश देण्यास सहकार्य करणार नाहीत, अशा शाळांविरुद्ध आवश्यक कायदेशीर कारवाई करावी. एकही बालक प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. - गोविंद नांदेडे,प्राथमिक शिक्षण संचालक,महाराष्ट्र राज्य