शहरं
Join us  
Trending Stories
1
"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 
2
१५ कोटींचे टार्गेट होते...! खोतकरांची ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी; धुळे विश्रामगृहातील पैशांवर राऊतांचा मोठा दावा
3
फोन आला अन् बाणेर हायवेवर अज्ञाताने वैष्णवीचे बाळ दिले; कुटुंबीयांची माहिती, आजोबा म्हणाले 'आयुष्यभर सांभाळू...'
4
घरातील सर्वांचा विरोध; तरीही वैष्णवीचा लव मॅरेजसाठी हट्ट, मामाने सगळा घटनाक्रम सांगितला..
5
पाकिस्तानी लष्करप्रमुख धार्मिक कट्टर..; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केली आसिम मुनीरची पोलखोल
6
आरोग्य विमा ३० वर्षांचे होण्याआधीच घ्या, नाहीतर 'महाग' पडेल! जाणून घ्या ७ मोठे फायदे
7
Apara Ekadashi 2025: एकादशीचा उपास निरोगी आयुष्य देणारा; फक्त त्यादिवशी 'हा' पदार्थ टाळा!
8
“आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला, आता राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा”; ठाकरे गटाचे नेते थेट बोलले
9
"लडकियों को में भी देखता हूं, इतना क्या...", अभिनेत्रीकडे एकटक बघत होता, जाब विचारल्यावर म्हणाला...
10
हृदयद्रावक! भावाच्या जीवाची भीक मागत होती बहीण; पण कोणीच केली नाही मदत, झाली हत्या
11
विमानावर वीज पडली तर काय होते? इंडिगोच्या विमानाने भरवली धडकी, जाणून घ्या किती सुरक्षित...
12
Vaishnavi Hagwane Case : 'वैष्णवीचे बाळ आणायला गेलो,आम्हाला बंदूक दाखवली'; मामांनी सगळंच सांगितलं
13
 काश्मीरमधील किश्तवाड येथील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, दोघांना लष्कराने घेरले 
14
Apara Ekadashi 2025: अकाली मृत्युचे भय टळावे, म्हणून अपरा एकादशीला करा 'ही' उपासना!
15
हेरगिरी प्रकरणात ज्योती मल्होत्राला दिलासा नाही, पोलिस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ; बँक खात्याची चौकशी सुरूच
16
पाकिस्तानने स्वतः युद्धविरामाची चर्चा केली, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा फेटाळला!
17
मानवतेचा महामेरु! पत्नी कॅन्सरने गेली, इतर रुग्णांची पैशांअभावी वणवण पाहता पतीची २० लाखांची देगणी
18
आधी वैभव सूर्यवंशीसोबत खोटा फोटो, आता प्रीती झिंटाची थेट कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?
19
Corona Virus : बूस्टर डोस घ्यावा लागेल का? चीन आणि भारतासह ५ देशांमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका
20
“मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा; जागावाटपाची चर्चा नको, मित्रपक्षांवर टीका टाळा”

रिद्धी-सिद्धीच्या शाळेचा आज पहिला दिवस

By admin | Updated: November 15, 2016 06:43 IST

सयामी जुळ्या म्हणून जन्माला आलेल्या रिद्धी-सिद्धी गेल्या तीन वर्षांपासून वाडिया रुग्णालयातच राहात आहेत. वाडिया रुग्णालयच आता त्यांचे

मुंबई : सयामी जुळ्या म्हणून जन्माला आलेल्या रिद्धी-सिद्धी गेल्या तीन वर्षांपासून वाडिया रुग्णालयातच राहात आहेत. वाडिया रुग्णालयच आता त्यांचे घर बनले आहे. जन्माला आल्यापासून आई-बाबा, नातेवाइकांचे प्रेम त्यांना मिळाले नाही; पण याची कमतरता त्यांना वाडिया रुग्णालय आणि प्रथम संस्थेच्या कार्यकर्त्यांनी कधीच जाणवू दिली नाही. आता रिद्धी-सिद्धी दोघीही तीन वर्षांच्या झाल्याने दिवाळीच्या सुट्टीनंतर सुरू होणाऱ्या शाळेत या दोघींची चिमुकली पावले पडणार आहेत. वाडिया रुग्णालयातच राहणाऱ्या या मुलींचे पालकत्व वाडिया रुग्णालय आणि प्रथम संस्थेने स्वीकारले आहे. तीन वर्षांच्या झाल्यावर त्यांना शिक्षण मिळावे यादृष्टीने त्यांना शाळेत दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केईएम रुग्णालयासमोर असलेल्या महापालिकेच्या पोयबावडी शाळेत उद्या (१५ नोव्हेंबर) सकाळी १०.३० वाजता त्या दोघी जाणार असल्याची माहिती प्रथम संस्थेच्या रेस्क्यू विभाग प्रमुख विक्रम कांबळे यांनी दिली. रायगड जिल्ह्यातील होलवा येथे शालू नामक महिलेने २०१३मध्ये सयामी जुळ्या मुलींना जन्म दिला. पहाटे जन्माला आलेल्या या जुळ्या मुलींचा शरीराचा खालील भाग जोडला गेला होता. त्यामुळे गावकऱ्यांनी वेगळा प्रकार आहे, अशी चर्चा सुरू केली. या मुलींचे काय करायचे या विचारात असताना प्रथम संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सयामी जुळ्यांना वाडिया रुग्णालयात आणले. या दोघींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या वेळी त्यांचे पालक त्यांच्याबरोबर आले होते. त्यांना वेगळे करण्याची शस्त्रक्रिया होईपर्यंत त्यांचे पालक रुग्णालयात होते. मात्र, त्यानंतर ते दोघींना रुग्णालयात सोडून गावी निघून गेले. (प्रतिनिधी)