शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

हिट अ‍ॅँड रन प्रकरणी युक्तिवाद आजपासून

By admin | Updated: April 1, 2015 02:26 IST

अभिनेता सलमान खानविरोधातील बहुचर्चित व प्रलंबित हिट अ‍ॅण्ड रन खटला आता अंतिम टप्प्यात आला आहे. उद्या, बुधवारपासून सरकारी पक्षाचा याप्रकरणी युक्तिवाद सुरू होणार आहे.

मुंबई: अभिनेता सलमान खानविरोधातील बहुचर्चित व प्रलंबित हिट अ‍ॅण्ड रन खटला आता अंतिम टप्प्यात आला आहे. उद्या, बुधवारपासून सरकारी पक्षाचा याप्रकरणी युक्तिवाद सुरू होणार आहे. तो मी नव्हेच, असे सांगून सर्व आरोप फेटाळल्यानंतर सलमानने हा दावा सिद्ध करण्यासाठी स्वत:चाच ड्रायव्हर अशोक सिंग याची साक्ष नोंदवली. त्यानेही सल्लूभाई या घटनेसाठी दोषी नसल्याने सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांच्यासमोर सांगितले. मात्र सिंग नंतर इतर कोणाचीही साक्ष नोंदवली जाणार नसल्याचे सलमानचे वकिल श्रीकांत शिवदे यांनी न्यायालयात स्पष्ट केले. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने उभय पक्षांचा युक्तिवाद सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बुधवारपासून विशेष सरकारी वकील प्रदीप घरत युक्तिवाद करतील. त्यांचा युक्तिवाद आठवडाभर तरी चालेल. त्यानंतर अ‍ॅड. शिवदे आपली बाजू मांडतील.वांद्रे येथे झालेल्या या घटनेत सलमानने भरधाव गाडी चालवत चौघांना चिरडले व त्यात एकाचा बळी गेला असा पोलिसांचा आरोप आहे. यात दोषी आढळल्यास सलमानला दहा वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. (प्रतिनिधी)