आज गरीब, शेतकरी दु:खी; गडकरी असे म्हणाले का? होय म्हणालेले, पण कधी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 07:01 IST2024-03-02T07:01:28+5:302024-03-02T07:01:54+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

आज गरीब, शेतकरी दु:खी; गडकरी असे म्हणाले का? होय म्हणालेले, पण कधी...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यात शेतकऱ्याला त्याच्या पिकाला भाव मिळत नाही. आज गावातील गरीब, मजूर, शेतकरी दु:खी आहेत. गावात चांगले रस्ते नाहीत, पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही, चांगली रुग्णालये नाहीत, चांगल्या शाळा नाहीत, असे त्यांनी म्हटल्याचा दावा करत हा व्हिडीओ शेअर करण्यात येत आहे.
मात्र, सद्य:स्थितीशी जोडणारा हा दिशाभूल करणारा व्हिडीओ आहे. त्यांनी केलेले हे विधान सध्याच्या सरकार येण्यापूर्वीच्या सरकारशी संबंधित आहे. त्यामुळे असे दिशाभूल करणारे व्हिडीओ तपासल्याशिवाय शेअर करू नका, असे आवाहन पीआयबी फॅक्टचेकने केले आहे.
गडकरी म्हणाले की, ज्या प्रमाणात इतर क्षेत्रामध्ये विकास झाला, तेवढा शेतीत झाला नाही. आमचे सरकार आल्यानंतर आम्हीही यासाठी खूप काम केले. ५ लाख कोटींचे इथेनॉल, ग्रीन हायड्रोजन जरी शेतकऱ्यांनी उत्पादित केले, तरी आपल्या देशातला शेतकरी सुखी, समृद्ध होईल. गावागावांत रोजगार निर्माण होईल.