आज दहा जण मंत्रीपदाची शपथ घेणार ?
By Admin | Updated: October 31, 2014 14:54 IST2014-10-31T14:47:34+5:302014-10-31T14:54:47+5:30
राज्यातील भाजपाप्रणीत सरकारच्या शपथविधी सोहळ्यात आज देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपाचे नऊ नेते मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

आज दहा जण मंत्रीपदाची शपथ घेणार ?
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ - राज्यातील भाजपाप्रणीत सरकारच्या शपथविधी सोहळ्यात आज देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपाचे नऊ नेते मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. सुधीर मुनगंटीवार, एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, प्रकाश मेहता, चंद्रकांत पाटील, विष्णू सावरा, दिलीप कांबळे आणि विद्या ठाकूर यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार आहे. यातील आठ जणांची कॅबिनेट तर दोघांची राज्यमंत्रीपदावर वर्णी लागणार आहे.
आज संध्याकाळी वानखेडे स्टेडियमवर शाही थाटात भाजपा सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात मोजक्याच नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल असे भाजपा नेत्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यामुळे आजच्या शपथविधी सोहळ्यात दहा जण शपथ घेतील असे सूत्रांनी सांगितले. महत्त्वाची खाती देवेंद्र फडवणीस स्वतःकडेच ठेवणार असल्याचे सांगितले जाते.