आजपासून 'नवरात्र' प्रारंभ
By Admin | Updated: October 1, 2016 09:00 IST2016-10-01T08:59:58+5:302016-10-01T09:00:14+5:30
आज दिनांक १ ऑक्टोबर रोजी घटस्थापना होत असून नवरात्रारंभ होत आहे. या दिवशी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे साधारणपणे पहाटे ५ वाजल्यापासून मध्याह्नसमाप्तिपर्यंत म्हणजे दुपारी१.३०पर्यंत घटस्थापना करता येईल.

आजपासून 'नवरात्र' प्रारंभ
अप्पासाहेब पाटील, ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. १ - आज दिनांक १ ऑक्टोबर रोजी घटस्थापना होत असून नवरात्रारंभ होत आहे. या दिवशी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे साधारणपणे पहाटे ५ वाजल्यापासून मध्याह्नसमाप्तिपर्यंत म्हणजे दुपारी१.३०पर्यंत घटस्थापना करता येईल. या दिवशी सकाळी ९ ते १०.३० यावेळेत राहुकाल असला तरीही त्या वेळेतही पूजन करता येईल. घटस्थापनेकरिता राहुकाल वर्ज्य करण्याची आवश्यकता नाही. १० ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्थापन (नवरात्र समाप्ति) व पारणा आहे व दसरा हा ११ ऑक्टोबर रोजी आहे. सर्वसाधारणपणे नवरात्रोत्थापन व दसरा एका दिवशी किंवा वेगवेगळ्या दिवशी आले तरी घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत ९ दिवस किंवा १० दिवसांचे अंतर असते. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत शक्ती देवीची जी उपासना केली जाते त्याला नवरात्र असे म्हणले जाते. हे दिवस तिथीच्या क्षय-वृद्धीमुळे कमी अधिक होत असतात. या वर्षी घटस्थापनेपासून ११ व्या दिवशी दसरा आहे. यापूर्वी अनेक वेळेस असे झालेले आहे त्यामुळे अकराव्या दिवशी दसरा येणे शुभ किंवा अशुभ अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा कितव्याही दिवशी आला तरी शुभच असतो. यापूर्वी १९९८ मध्ये याच प्रमाणे अकराव्या दिवशी दसरा आलेला होता.