शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

आजच उरका बँकेची महत्वाची कामे, तीन दिवस राहणार बँका बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 1:33 PM

तुमची बँकांमधील काही महत्वाची कामे असतील, तर ती आजच पूर्ण करुन घ्या. नाहीतर पुढील ३ दिवस तुमची कामे....

मुंबई - तुमची बँकांमधील काही महत्वाची कामे असतील, तर ती आजच पूर्ण करुन घ्या. नाहीतर पुढील ३ दिवस तुमची कामे रखडतील. याला कारण म्हणजे उद्यापासून सलग ३ दिवस राज्यभरात बँका बंद राहणार आहेत. प्रजासत्ताक दिनाला (26 जानेवारी) जोडून चौथा शनिवार व रविवार आल्यामुळे बँका सलग तीन दिवस बंद असणार आहेत. यामुळे बँकिंग व्यवहार होऊ शकणार नाहीत. या तीन दिवसांत बँका बंद असल्याने बँकेतील महत्त्वाची काम आजच पूर्ण करावी लागणार आहेत.

जोडून सुटी आल्यामुळे बाहेरगावी जाण्याचे, पर्यटनस्थळी जाण्याचे प्रमाण वाढणार आहे. अनेकांनी काही दिवस आधीच हॉटेल्स, रिसॉर्ट यांचे तसेच रेल्वे, विमान यांचे बुकिंगही केले आहे. मात्र प्रवासादरम्यान हाताशी रोकड असणे सर्वांनाच सोयीचे असते. अशी रोकड पुरेशा प्रमाणात असावी, यासाठी आज, गुरुवारीच बँकांतून ती काढून घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

मुंबई-गोवा रिटर्न एअर तिकीट तब्बल 26 हजारांवर मुंबई-गोव्याचं परतीचं विमान तिकीट तब्बल 26 हजार रुपयांवर पोहचलं आहे. तुम्ही जर आतापर्यंत विमान तिकीट बुक केलं नसेल, तर येत्या लाँग वीकेंडचं प्लानिंग तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं. प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवार 26 जानेवारीची सुट्टी आणि शनिवार-रविवार असा लागून तीन दिवसांचा लाँग वीकेंड आला आहे. मात्र या दिवसात गोव्याला जाणं तुमच्या खिशाला चाट लावू शकतं.26 जानेवारीला मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी आणि 28 जानेवारीला परतण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त तिकीटाची किंमत आहे 26 हजार रुपये. विशेष म्हणजे या विमानांच्या वेळाही अडनिड्या आहेत, म्हणजेच फारशा सोयीस्कर नाहीत. त्यासाठी जाताना तुम्हाला रात्री दहा वाजताचं विमान पकडावं लागेल, तर परतण्यासाठी गोव्याहून भल्या पहाटे 4 वाजता निघावं लागेल.  

टॅग्स :bankबँकRepublic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८