सरकारी अधिकारी बनायचंय, हा चष्मा घालवा; सर्जरी करून गायब केला जातोय अडसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 08:13 IST2023-07-13T08:13:20+5:302023-07-13T08:13:45+5:30

बदलत्या जीवनशैलीसह अनेक कारणांमुळे कमी वयातच चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले आहे

To become a government official, wear these glasses; The obstruction is removed by surgery | सरकारी अधिकारी बनायचंय, हा चष्मा घालवा; सर्जरी करून गायब केला जातोय अडसर

सरकारी अधिकारी बनायचंय, हा चष्मा घालवा; सर्जरी करून गायब केला जातोय अडसर

संतोष हिरेमठ  

छत्रपती संभाजीनगर : डाॅक्टर साहेब, सरकारी अधिकारी बनायचे आहे. काहीही करून हा चष्मा घालवा, असे म्हणत अनेक जण नेत्रतज्ज्ञांकडे डोळ्यांची शस्त्रक्रिया करून चष्मा घालविण्यासाठी येत आहेत. इतर कारणांमुळेही चष्मा घालविण्याची शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे.  

बदलत्या जीवनशैलीसह अनेक कारणांमुळे कमी वयातच चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु हाच चष्मा अनेकांना नकोसा होतो. त्यामुळे शस्त्रक्रिया करून चष्माच घालविण्याचे प्रमाण आता वाढत आहे.

महिन्याला किती शस्त्रक्रिया? 
छत्रपती संभाजीनगरमध्ये ही शस्त्रक्रिया करणारे जवळपास २५ डाॅक्टर आहेत. मात्र, काही मोजक्या रुग्णालयांतच आजघडीला शस्त्रक्रिया होत आहेत. महिन्याकाठी ५० शस्त्रक्रिया होत असल्याचे नेत्रतज्ज्ञांनी सांगितले. 

...तरच सर्जरी 
चष्म्याचा नंबर एक वर्षापर्यंत स्थिर असेल, त्यात कोणताही बदल होत नसेल तर शस्त्रक्रिया करून चष्मा घालविता येतो. या शस्त्रक्रियेमुळे नंबर शून्य होऊन जातो. म्हणजे चष्मा वापरण्याची गरजच पडत नाही. - डॉ. अरुण अडचित्रे,  अध्यक्ष, नेत्ररोग तज्ज्ञ संघटना

प्रमाण वाढले
चष्मा घालविण्याची, नंबर कमी करण्याची शस्त्रक्रिया म्हणजे लॅसिक सर्जरी करण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. ही शस्त्रक्रिया करून घेणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण काहीसे अधिक आहे.- डाॅ. मनोज सासवडे, नेत्ररोग तज्ज्ञ 

का नको वाटतो चष्मा?  
लग्न जुळण्यास अडथळा, सौंदर्यात बाधा
अभिनेता, अभिनेत्री, माॅडेल बनायचे म्हणून
सरकारी नोकरीसाठी अडथळा
चष्म्यावरून वारंवार विनोदाचा विषय
चष्मामुळे प्रगती होत नसल्याची भावना
यासह विविध छोटी-मोठी कारणे. 

Web Title: To become a government official, wear these glasses; The obstruction is removed by surgery