शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

भाजपाने आणली शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ - राधाकृष्ण विखे पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 7:26 PM

अच्छे दिनचे स्वप्न दाखवणा-या भाजपा सरकारने सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले आहे. एवढेच नाहीतर देशाचा पोशिंदा असलेल्या शेतक-याला न्याय देण्याऐवजी आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचा टीका विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 

वरवटबकाल (ता. संग्रामपूर) : अच्छे दिनचे स्वप्न दाखवणा-या भाजपा सरकारने सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले आहे. एवढेच नाहीतर देशाचा पोशिंदा असलेल्या शेतक-याला न्याय देण्याऐवजी आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचा टीका विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा बुलडाणा जिल्ह्यात दाखल शनिवारी दाखल झाली. ही जनसंघर्ष यात्रा दुपारी ४.३० वाजता वरवटबकाल येथे दाखल झाली. यानिमित्त आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुकुलजी वासनिक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खा.अशोक चव्हाण अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान सभेतील काँग्रेस पक्षाचे उपनेते विजय वडेट्टीवार, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे,महाराष्ट सहप्रभारी आशिषजी दुआ,आ.वजाहत मिर्जा,आ.अब्दुल सत्तार,जिल्हा अध्यक्ष आमदार राहुल बोन्द्रे,आ. हर्षवर्धन सपकाळ, (अखिल भारतीय कॉग्रेस सरचिटणीस)प्रदेश सरचिटणीस अॅड, गणेश पाटील, प्रदेश सरचिटणीस शामभाऊ उमाळकर, मदन भरगड, संजय राठोड, विजय अंभोरे,यांच्यासह राज्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते तसेच जळगाव जामोद मतदार संघातीलपदाधिकारी सह बुलढाणा काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षा डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर उपस्थित होते. यापुढे पुढे बोलतांना विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली. मोदी सरकारला जनशक्तीची ताकद आपल्या मतदानातून दाखवण्याची वेळ आली आहे. या सरकारने हा देश पोखरून काढला आहे. जलयुक्त शिवार फक्त नावालाच असल्यामुळे या योजनेबाबत कोटी रुपयांची उलाढाल केली. ही रक्कम शेतक-यांच्या घामाची असून शेतक-यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासनही सरकार पूर्ण करू शकले नाही. सरकार भगवान रामाच्या नावाचा राजकारण करीत असून  जातीय आरक्षणाबाबत कुठलाही ठोस निर्णय न घेता त्यावर केवळ राजकारण केल्या जात असल्याचे विखे पाटील म्हणाले. राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचे संग्रामपूर तालुक्यात सोनाळा येथे दाखल होताच येथील कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतीषबाजीत स्वागत केले. दरम्यान काटेल येथे संत गुलाब बाबा यांच्या पादुकांचे दर्शन घेतले.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलcongressकाँग्रेस