शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाबाबत वेळकाढूपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2016 01:39 IST

राज्य सरकारने ‘धनगड’ व ‘धनगर’ एकच असून येथील धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण बहाल करावे

लोणी भापकर : राज्य सरकारने ‘धनगड’ व ‘धनगर’ एकच असून येथील धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण बहाल करावे, अशी शिफारस करण्याची गरज आहे. त्याऐवजी सध्याचे फडणवीस सरकार धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत अनावश्यक अभ्यासगट नेमून वेळकाढूपणा करीत आहे, असा आरोप राष्ट्रीय धनगर आरक्षण कृती समितीचे निमंत्रक नवनाथ पडळकर यांनी बारामती येथील बैठकीत केला. केंद्र सरकारने धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीचे राज्य सरकारला आदेश द्यावेत, यासाठी कृती समितीच्या वतीने ७ आॅगस्ट रोजी संसदेवर मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती या वेळी पडळकर यांनी दिली. राष्ट्रीय धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने काल धनगर समाजाची बारामती येथील वसंतराव पवार नाट्यगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी पडळकर बोलत होते. अ‍ॅड. गुंडेराव बनसुडे अध्यक्षस्थानी होते. या वेळी बारामती तालुक्यातील समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. सध्याचे सरकार मात्र अशा शिफारशीऐवजी टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेससारख्या गैरसरकारी संस्थेचा अभ्यासगट नेमून वेळकाढूपणा करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातून समाजात प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे. यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा व राज्य सरकारकडून शिफारस मागवावी. त्याआधारे केंद्र सरकारने रजिस्ट्रार जनरल आॅफ इंडिया व अनुसूचित जमाती आयोगाकडून अभ्यासगट नेमून राज्यातील धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीचे राज्य सरकारला आदेश द्यावेत, या मागणीसाठी दि. १७ जुलैपासून कृती समितीच्या वतीने नवी दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर धरणे आंदोलन सुरू आहे. (वार्ताहर)या वेळी पडळकर म्हणाले, ‘‘महाराष्ट्र राज्यातील धनगर समाज राज्यघटनेतील कलम ३४२ नुसार बहाल केलेल्या अनुसूचित जमाती आरक्षणासाठी १९५६पासून आंदोलन करीत आहे. राज्य सरकारने, महाराष्ट्रातील ‘धनगड व धनगर’ एकच असून, ती केवळ स्पेलिंगमधील चूक आहे; राज्यात केवळ धनगर समाज असून त्याला घटनेनुसार अनुसूचित जमातींच्या सवलती द्याव्यात, अशी शिफारस केंद्राकडे करण्याची गरज आहे. दि. ७ आॅगस्ट रोजी धनगर समाजाचा संसदेवर मोर्चा नेण्यात येणार आहे. या वेळी हरियाना, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली व महाराष्ट्र या राज्यांतील समाजबांधव एकत्र येतील, असे पडळकर यांनी या वेळी सांगितले.