शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दलाई लामांच्या स्वागतास तिबेटियन बांधवांत उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 02:52 IST

अहिंसेच्या मार्गाने तिबेट स्वतंत्र व्हावा हीच इच्छा

- प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : धम्म परिषदेच्या निमित्ताने बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांचे शुक्रवारी शहरात आगमन होत आहे. ५५ वर्षांनंतर शहरात येत असलेल्या धर्मगुरूंच्या स्वागतासाठी शहरात जय्यत तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे निर्वासित तिबेटियन बांधवांमध्येही आनंदाचे वातावरण पसरले आहे. आपल्या लाडक्या धर्मगुरूंचे कधी एकदा जवळून दर्शन होते, याची प्रचंड उत्सुकता त्यांच्यात निर्माण झाली आहे.तिबेटी जनतेसाठी दलाई लामा म्हणजे सर्वेसर्वा. १४ व्या लामांचे नेतृत्व तिबेटी जनतेने राजकीय व धार्मिक नेतृत्व म्हणून स्वीकारले आहे. शहरात निर्वासित तिबेटियन बांधवांचे कॅम्प नाहीत; पण १९८० पासून दरवर्षी न चुकता हे बांधव गरम कपडे घेऊन शहरात वास्तव्याला येतात. आता तर तिबेटियन बांधव आले की, हिवाळा सुरू झाला असे समीकरणच जुळले आहे.तिबेटियनच्या स्वेटर्स मार्केटमध्ये भगवान गौतम बुद्धांची मूर्ती व धर्मगुरू दलाई लामा यांचे छायाचित्र ठेवण्यात आले आहे. मार्केट सुरू करण्यापूर्वी येथे सर्व तिबेटियन बांधव दिवा लावतात, अगरबत्ती लावतात व साधना करतात. धर्मगुरू दलाई लामा औरंगाबादेत येणार ही माहिती मिळताच या बांधवांमध्ये आनंद पसरला. यासंदर्भात तिबेटियन मार्केटचे अध्यक्ष टी. यारफेल यांनी सांगितले की, धर्मगुरू दलाई लामा यांना आम्ही बोधिसत्त्व व संरक्षक संत अवलोकितेश्वर यांचा अवतार मानतो. आम्हालाही त्यांचे स्वागत करता यावे. यासाठी आम्ही धम्म परिषदेचे आयोजक हर्षदीप कांबळे यांना भेटलो आहोत.चीनने तिबेटियनांवर अनन्वित अत्याचार केले. १७ मार्च १९५९ रोजी दलाई लामा हे सुमारे ८० हजार तिबेटियनांसोबत भारतात वास्तव्यास आले. आजमितीस भारतात तिबेटियनांची संख्या सुमारे सव्वालाखाच्या आसपास आहे. सर्वाधिक तिबेटियन बांधव कर्नाटक राज्यात राहतात. त्याखालोखाल हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ओडिसा, महाराष्ट्र, छत्तीसगड, पश्चिम बंगाल येथील निर्वासित कॅम्पमध्ये राहतात. शहरात सध्या स्वेटर्स विक्रीच्या निमित्ताने ३० पुरुष व ३० महिला तिबेटियन आले आहेत.धर्मगुरूंना भेटण्यासाठी आम्ही अधूनमधून हिमाचल राज्यातील धर्मशाळा येथे जात असतो. मी यापूर्वी धर्मगुरूंचे तिथेच दुरून दर्शन घेतले आहे. त्यांचे जवळून दर्शन घेण्याची इच्छा आहे. शहरातील औरंगाबाद लेणीच्या पायथ्याशी असलेल्या बुद्धविहारात आम्ही साधना, प्रार्थनेसाठी जात असतो. सर्व तिबेटियन बांधवांची एकच इच्छा आहे की, ‘तिबेट स्वतंत्र’ व्हावा व तोही अहिंसेच्या मार्गाने.शहरातील तिबेटियनमध्ये माजी सैनिकलोपसंग ताशी यांनी सांगितले की, शहरात उबदार कपडे विक्रीसाठी आलेल्या तिबेटियन बांधवांमध्ये १० जण माजी सैनिक आहेत. त्यातील काही जणांनी कारगिल युद्ध, तर काही जणांनी भारत-पाकिस्तान युद्ध लढले आहे. आम्ही निर्वासित असलो तरी भारतीयांनी आम्हाला निर्वासिताची कधी वागणूक दिली नाही. एवढे प्रेम भारतीयांनी आम्हाला दिले आहे.‘खाता’ देऊन दलाई लामांचे होणार स्वागततिबेटियन बांधवांमधील ज्येष्ठ सदस्य एस.डी. छौपेल यांनी सांगितले की, तिबेटियन लोक आनंदाच्या प्रसंगी मान्यवरांचे स्वागत खाताने (पांढरे उपरणे) देऊन करीत असतात. या खातावर ‘अष्टांग चिन्ह’ असते. या ‘खाता’ला तिबेटियन संस्कृतीत मोठे महत्त्व आहे. याच ‘खाता’ने आम्ही धर्मगुरू दलाई लामा यांचे शहरात स्वागत करू. यासाठी सुमारे दोन ते अडीच फुटांचा पांढराशुभ्र ‘खाता’ आणला आहे.10 डिसेंबर १९८९ यादिवशी तिबेटियन धर्मगुरू दलाई लामा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. तिबेटियन बांधवांसाठी हा दिवस अभिमानाचा व गौरवाचा ठरला.यामुळे दरवर्षी जिथे असले तिथे तिबेटियन बांधव १० डिसेंबर रोजी वर्धापन दिन म्हणून साजरा करतात. शहरातही यादिवशी विशेष कार्यक्रम आम्ही घेत असतो, असेही छौपेल यांनी सांगितले.

टॅग्स :Dalai Lamaदलाई लामा