The 'Thugs of Maharashtra' | ''ठग्ज ऑफ महाराष्ट्र' म्हणणारेच ठगांमध्ये जाऊन बसले'
''ठग्ज ऑफ महाराष्ट्र' म्हणणारेच ठगांमध्ये जाऊन बसले'

मुंबई : विरोधी पक्षनेता असताना ज्यांना ‘ठग्ज ऑफ महाराष्ट्र’ म्हटले होते, त्याच ‘ठगांमध्ये’ ते कधी जाऊन बसले ते आम्हाला कळालेच नाही, अशी कोपरखळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना मारली.

राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना पवार यांनी बालभारतीच्या नवीन शिक्षण पद्धतीचे वाभाडे काढले. ही पद्धत विद्यार्थ्यांचे वाटोळे करणारी आहे, म्हणून मुख्यमंत्र्यांनी विनोद तावडे यांना शिक्षण खात्यातून बाजुला केले का? असा सवालही त्यांनी केला. शिवसेनेने निष्ठावान शिवसैनिकांना डावलून जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपद दिले. हा सामान्य शिवसैनिकांवर अन्याय आहे. त्यांनी किती काळ तुमच्या सतरंज्या उचलायच्या? मुख्यमंत्र्यांवर ज्यांनी ५००० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला, त्यांनाच मंत्रिमंडळात कसे घेतले? ६ मंत्र्यांना यावेळी वगळण्यात आले त्याचे कारण काय ? याचे कारण सभागृहाला कळायला हवे. या मंत्र्यांनी कामे केली नाही की, भ्रष्टाचार केला, की पक्षाला हवे तसे काम केले नाही त्यामुळे यांना वगळण्यात आले का ? हे स्पष्ट व्हायला हवे अशीही मागणी पवार यांनी केली.


Web Title: The 'Thugs of Maharashtra'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.