शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

देशद्रोहींना अभय देणाऱ्यांना सत्तेतून खेचा- अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 04:50 IST

युती सरकारवर टीका, ठाण्यासह कल्याणातही जाहीर सभा

कल्याण : शिवसेना-भाजपाचा कारभार म्हणजे आतून कीर्तन आणि बाहेरून तमाशा असा सुरू आहे. त्यामुळे सामान्य माणूस त्रस्त झाला आहे. एकीकडे बॉम्ब बनविणारे पकडले जातात तर दुसरीकडे सनातन संस्थेची पाठराखण करण्याचे काम सरकार करीत आहे. अशा देशद्रोहींना अभय देणाऱ्या सरकारला सत्तेवरून खाली खेचा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी गुरुवारी केले.काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या कल्याण येथील सभेत चव्हाण यांनी बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे आदी उपस्थित होते. कल्याण-डोंबिवलीतही गुंडगिरी वाढली आहे. धनंजय कुलकर्णीकडे मोठा शस्त्रसाठा सापडला. समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सरकारकडून सुरू असल्याचा आरोप यावेळी विखे पाटील यांनी केला.तत्पूर्वी प्रमुख वक्ते सभेच्या ठिकाणी यायच्या आधी व्यासपीठावर लावलेल्या बॅनरवरून झालेल्या वादात प्रकाश मुथा आणि संजय दत्त गट आमनेसामने आले.‘छत्रपतींची उंची गाठण्यासाठी सात जन्म घ्यावे लागतील’ठाणे: पाच वर्षांत काहीच न केलेल्या सरकारने फक्त पेपरमध्ये मोठ-मोठ्या जाहिराती केल्या. ‘लेकर छत्रपती शिवाजी का नाम, चले चलो मोदी के साथ’ या जाहिरातीतून मोदी छत्रपती शिवाजी महाराजांशी स्व:तशी तुलना क रतात, हे चुकीचे आहे. भाजपाला विनाश काले विपरीत बुध्दी सुचली आहे. ते आता शिवाजी महाराज आणि मोदींची तुलना करण्याचे काम करीत आहेत. पण, शिवाजी महाराजांची उंची गाठण्यासाठी मोदींना अजून सात जन्म घ्यावे लागतील, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी जनसंघर्ष यात्रेनिमित्त शुक्रवारी ठाण्यात झालेल्या जाहीर सभेत टीका केली.ठाणे जिल्हा शहर कॉँग्रेस कमिटीच्या वतीने राबोडीत जनसंघर्ष यात्रा व जाहिर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी चव्हाण यांनी भाजपा आणि शिवसेनेवर जोरदार टिका केली. काँग्रेस कार्यकर्त्यांना लोकांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी काँग्रेसचे कोकण प्रभारी बी.एस. संदीप, खासदार हुसने दलवाई, प्रवक्ते सचिन सावंत, माजी आमदार मुझफ्फर हुसेन, शहराध्यक्ष मनोज शिंदे,आयोजक रविंद्र आंग्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.दरम्यान, कल्याण येथे पार पडलेल्या काँग्रेसच्या सभेमध्ये कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे माजी आमदार रमेश पाटील यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते २00९ च्या निवडणुकीवेळी मनसेत, तर त्यानंतर भाजपामध्येही प्रवेश केला होता.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना