खंडणीची मागणी करून तीन महिलांचा विनयभंग
By Admin | Updated: September 11, 2016 19:45 IST2016-09-11T19:45:53+5:302016-09-11T19:45:53+5:30
कळव्यातील एका घरात शिरून 10 हजारांची खंडणी मागत त्याच घरातील तीन महिलांचा विनयभंग करून धमकी देणा:या गणोश शिंदे ऊर्फ काळा गण्या आणि अंकुश गावंड या दोघांना कळवा पोलिसांनी शनिवारी अटक केली

खंडणीची मागणी करून तीन महिलांचा विनयभंग
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. ११ : कळव्यातील एका घरात शिरून 10 हजारांची खंडणी मागत त्याच घरातील तीन महिलांचा विनयभंग करून धमकी देणा:या गणोश शिंदे ऊर्फ काळा गण्या आणि अंकुश गावंड या दोघांना कळवा पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. त्यांना 14 सप्टेंबर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणो न्यायालयाने दिले आहेत. गणोश आणि त्याच्या तीन साथीदारांनी 9 सप्टेंबर रोजी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास कळव्यातील एका घरात शिरून धुमाकूळ घातला. त्यांनी त्या घरातील 38 वर्षीय व्यक्तीकडे 1क् हजारांच्या खंडणीची मागणी केल्यानंतर त्यांची पत्नी आणि दोन मुलींशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. तसेच त्यांना शिवीगाळ करून खून करून रेल्वे मार्गावर फेकून देण्याची धमकी दिली.
या प्रकारानंतर या टोळीने तिथून पलायन केले. दुस:या दिवशी 10 सप्टेंबर रोजी याप्रकरणी तिघांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात खंडणी, धमकी देणो, शिवीगाळ करणो आणि विनयभंगाच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. कळवा पोलिसांनी याप्रकरणी गणोश आणि अंकुश या दोघांना अटक केली असून त्यांच्या इतर साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक एम.जे. घाडगे या अधिक तपास करीत आहेत.