शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
5
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
6
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
7
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
8
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
9
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
10
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
11
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
12
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
13
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
14
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
15
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
16
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
17
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
18
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
19
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
20
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही

टीडीआर घोटाळ्याची तीन महिन्यात चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 4:20 AM

औरंगाबाद येथील कोट्यवधी रुपयांचा टीडीआर घोटाळा मंगळवारी विधानसभेत गाजला.

नागपूर : औरंगाबाद येथील कोट्यवधी रुपयांचा टीडीआर घोटाळा मंगळवारी विधानसभेत गाजला. मध्य औरंगाबादचे आमदार इम्तियाज सय्यद जलील यांच्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्र्रकरणाची चौकशी तीन महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. तसेच अशा प्रकरणांच्या चौकशीची कालमर्यादा निश्चित करण्यात येईल, असे आश्वासनही दिले.इम्तियाज सय्यद यांनी हा प्रश्न उपस्थित करीत हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार चौकशी केली जात आहे. परंतु सात महिन्यात केवळ फाईल एकत्र करण्यात आल्या. यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, चौकशीची कालमर्यादा निश्चित केली जाईल. प्रत्येक महापालिकेने टीडीआरबाबत पारदर्शकता ठेवावी, असे निर्देशही प्रत्येक महापालिकेला देण्यात येतील. महानगरपालिकेचे कर्मचारी एकाच मनपात काम करताात. एका महपालिकेतील कर्मचाऱ्याची दुसºया महापालिकेत बदली व्हावी, याबाबत राज्य शासन विचार करीत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.नजरचुकीने दिले प्रमाणपत्रमुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, संजय सिकचे यांना देण्यात आलेले टीडीआर प्रमाणपत्र नजरचुकीने देण्यात आले. औरंगाबाद मनपाने २५ जानेवारी २०१७ रोजी हे प्रमाणपत्र रद्द केले. इम्तियाज जलील यावर म्हणाले की, एकूण २२६ प्रमाणपत्र देण्यात आले आहे. ते सर्व नजरचुकीने देण्यात आले का?भिवंडी निजामपूर मनपातील रस्ता दुरुस्तीसंदर्भात दोषींविरुद्ध कारवाईभिवंडी निजामपूर महानगरपालिकेतील आर्थिक नुकसानीबाबत आयआयटी मुंबई यांच्याकडून मानकांनुसार कमी केलेल्या कामाच्या रकमेची परिगणना करून त्याअनुषंगाने संबंधित ठेकेदाराविरुद्ध नोटीस बजावून रक्कम वसूल करण्याची कार्यवाही भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकास्तरावर सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने रस्त्यांच्या गुणवत्तेविषयक प्राप्त तक्रारीनुसार शहानिशा करण्यासाठी आयआयटी मुंबई यांची नियुक्ती केली. आयआयटीच्या अहवालानुसार महानगरपालिकेने उपरोक्त रस्त्याच्या कामाशी संबंधित चार कनिष्ठ अभियंता, एक उपअभियंता यांना निलंबित केले असून त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. सदस्य रूपेश म्हात्रे यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. सदस्य अस्लम शेख यांनी यावेळी चर्चेत सहभाग घेतला.नवजात बाळाच्या चोरीचा तपास सीआयडी चौकशीऔरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयातून चोरी गेलेल्या नवजात बाळा (मुलगी)च्या प्रकरणाची चौकशी आता सीआयडीमार्फत करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली. प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. चोरी गेलेल्या बाळाची आई दररोज पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहे. तिला तपास सुरू असल्याचे सांगत परत पाठविले जाते. सत्तार यांनी सांगितले की, रुग्णालयात सीसीटीव्ही लागले आहेत. परंतु घटनेच्या वेळी सीसीटीव्ही बंद होते. यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी घटनेच्या वेळी सीसीटीव्ही बंद असल्याची कबुली दिली. मुलीच्या आईजवळ एक बुरखा घातलेली महिला आली. दोघींनी खून वेळ गोष्टी केल्या. त्यानंतर मुलीकडे लक्ष ठेवण्यास सांगून मुलीची आई वॉशरुममध्ये गेली. यादरम्यान ती महिला नवजात बाळाला घेऊन पळाली. महिलेने बुरखा घातला असल्याने तिची ओळख पटू शकली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. परंतु आ. सत्तार यांनी या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली. ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेºयांची दुरुस्ती करून ते नेहमी सुरू राहतील, याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.तारापूर औद्योगिक वसाहत ४० आस्थापना विरोधात कार्यवाही : कामगार मंत्रीतारापूर औद्योगिक वसाहतीतील काही आस्थापनांनी कामगारांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम संबंधित कार्यालयाकडे जमा केलेली नाही. तसेच काहींनी ती उशिराने जमा केली, याबाबत त्यांच्या विरोधात भविष्य निर्वाह निधी अधिनियम १९५२ च्या कलम ७ अ अंतर्गत कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. याबाबत अधिक माहिती देताना मंत्रिमहोदयांनी सांगितले, भादंवि कलम ४०५ अंतर्गत ४०६-४०९ अन्वये प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त, मुंबई यांचेमार्फत पाच आस्थापनांविरुद्ध पालघर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदविण्यात आलेली आहे. तसेच कामगारांच्या आरोग्यविषयक अडीअडचणीबाबत बैठक घेऊन संबंधितांना सूचना देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. सदस्य डी.एस. आहिरे यांनी यासंदर्भातील प्रश्न विचारला होता. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, संजय केळकर, जितेंद्र आव्हाड यांनी सहभाग घेतला होता.