शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

तीन आरोपींची जन्मठेप रद्द

By admin | Updated: June 4, 2014 01:06 IST

अमरावती जिल्ह्यातील एका हत्याप्रकरणात सरकारी पक्ष संशयाशिवाय गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीन आरोपींची जन्मठेपेची शिक्षा रद्द केली आहे.

हायकोर्ट : अमरावती जिल्ह्यातील हत्याप्रकरणनागपूर : अमरावती जिल्ह्यातील एका हत्याप्रकरणात सरकारी पक्ष संशयाशिवाय गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यामुळे मुंबई  उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीन आरोपींची जन्मठेपेची शिक्षा रद्द केली आहे.राजेश गाडाभाई पटेल (३0) रा. गुजरात, मोहम्मद तौफिक मोहम्मद शब्बीर शाह (२८) व राजू रामा जयस्वाल (३३) दोन्ही रा.  उत्तर प्रदेश अशी आरोपींची नावे आहेत. अचलपूर सत्र न्यायालयाने १९ जानेवारी २0१0 रोजी तिन्ही आरोपींना भादंविच्या कलम  ३0२ अंतर्गत जन्मठेप, तर कलम ३९२ अंतर्गत सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध आरोपींनी उच्च  न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपींचे अपील स्वीकारून सत्र  न्यायालयाचा निर्णय रद्द केला. मृताचे नाव बजरंग खंडेलवाल आहे. खटल्यातील माहितीनुसार, ३ मार्च २00८ रोजी रात्री ९ च्या सुमारास फिर्यादी गिरधारी  सिरोया व बजरंग खंडेलवाल हे किराणा दुकान बंद करून घरी परतत होते. दोघांकडेही रोख रकमेच्या बॅगा होत्या. गोरक्षण  धर्मशाळेजवळ पोहोचल्यानंतर अचानक तीन जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. एकाने गिरधारीकडील बॅग हिसकावून पळ काढला.  गिरधारी त्याचा पाठलाग करीत काही दूर धावला.  अन्य दोन आरोपी बजरंगसोबत हातापाई करीत होते. त्यांनी बजरंगला  पिस्टलची गोळी झाडून ठार केले. तपासादरम्यान पोलिसांना सात आरोपींनी दरोड्याचा कट रचल्याची माहिती मिळाली. यामुळे  त्यांनी सातही आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सुनावणीनंतर सत्र न्यायालयाने उपरोक्त तीन आरोपींना  शिक्षा ठोठावून अन्य आरोपींना निर्दोष सोडले होते. (प्रतिनिधी)