कार अपघातात तिघे जखमी
By Admin | Updated: August 17, 2015 00:43 IST2015-08-17T00:43:32+5:302015-08-17T00:43:32+5:30
मुंबई - गोवा महामार्गावर वीर रेल्वे स्थानक हद्दीत शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पुण्याकडे जाणारी एक मारुती आल्टो कार उभ्या ट्रकखाली शिरली

कार अपघातात तिघे जखमी
दासगाव : मुंबई - गोवा महामार्गावर वीर रेल्वे स्थानक हद्दीत शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पुण्याकडे जाणारी एक मारुती आल्टो कार उभ्या ट्रकखाली शिरली. या अपघातात कारमधील तीन प्रवासी जखमी झाले.
दुपारी शिंदे धाब्यासमोर आल्टो कार आल्यानंतर कारचालकाचा ताबा सुटला व विरुद्ध दिशेला रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या ट्रकखाली ५ फूटापर्यंत शिरली. अपघातात अवधूत साळुंखे (४९), सतीश जाधव (४७), बबन कांबळे (सर्व रा. सुरवडे,फलटण)जखमी झाले. देवदर्शन करून फलटणला परत असताना हा अपघात झाला. जखमींवर माणगावच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
आहेत. (वार्ताहर)