मातेसह तीन मुलींचा बुडून मृत्यू, दस-याचे धुणे बेतले जीवावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 23:56 IST2017-09-19T23:55:29+5:302017-09-19T23:56:54+5:30

दस-याचे धुणे धुण्यासाठी गेलेल्या मातेसह ३ मुलींचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील सलगरा येथे मंगळवारी घडली आहे. रात्री ८ वाजेपर्यंत तीन मुलींचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला होता़. 

Three girls die drowning with their mother, ten-to-be washed dead | मातेसह तीन मुलींचा बुडून मृत्यू, दस-याचे धुणे बेतले जीवावर

मातेसह तीन मुलींचा बुडून मृत्यू, दस-याचे धुणे बेतले जीवावर

नळदुर्ग (जि़उस्मानाबाद) : दस-याचे धुणे धुण्यासाठी गेलेल्या मातेसह ३ मुलींचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील सलगरा येथे मंगळवारी घडली आहे़.  रात्री ८ वाजेपर्यंत तीन मुलींचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला होता़. 
सलगरा (दि़) येथील छायाबाई मधुकर चव्हाण (३५) या आपल्या शीतल (१९), मनिषा (१६) व अश्विनी (१४) तीन मुलींसह मंगळवारी दुपारी दस-याचे धुणे धुण्यासाठी शेतातील विहिरीवर गेल्या होत्या़. सायंकाळपर्यंत त्या परत न आल्याने शोध घेतला असता, त्यांचे मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले़.

ही घटना तातडीने नळदुर्ग पोलिसांना कळविण्यात आली़. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने शीतल, मनिषा व अश्विनीचा मृतदेह बाहेर काढला़, रात्री उशिरापर्यंत छायाबाई यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला नव्हता, अशी माहिती नळदुर्ग पोलिसांनी दिली़. तिन्ही मुलींचे मृतदेह बाहेर काढल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी सलगरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले़. याबाबत रात्री उशिरापर्यंत नळदुर्ग पोलिसांत नोंद घेण्याची प्रक्रिया सुरु होती़

Web Title: Three girls die drowning with their mother, ten-to-be washed dead