शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

कोरेगाव भीमासह 'या' अठरा गावांमध्ये ३० डिसेंबरपासून तीन दिवस संचारबंदी : डॉ. अभिनव देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 22:11 IST

पुणे - नगर महामार्ग खराडी राहणार बंद , जिल्ह्याच्या सीमांवर होणार नाकाबंदी

ठळक मुद्देपुणे - नगर महामार्ग खराडी राहणार बंद , जिल्ह्याच्या सीमांवर होणार नाकाबंदीमोजक्या व्यक्ती वगळता इतर कोणतीही व्यक्ती या परिसरात येणार नाही यासाठी दक्षता मानवंदना कार्यक्रम प्रतिकात्मक आणि साध्या पद्धतीने साजरा व्हावा यासाठी शासनाने परिपत्रक चाकण ते शिक्रापूर व शिक्रापूर ते चाकण जाणारी येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा लगत असलेल्या पेरणे (ता. हवेली) येथिल ऐतिहासिक विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रम यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने प्रतिकात्मक आणि साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. बाहेरील नागरिकांना कोरेगाव भीमा व परिसरातील अठरा गावांमध्ये येण्यास ३० डिसेंबरपासून बंदी घालण्यात आली असुन पुणे जिल्ह्याच्या सर्व सिमांवर नाकाबंदी करण्यात येणार असल्याचे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथिल पोलीस ठाण्यात कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम संदर्भात पत्रकार परिषदेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद देशमुख, दौड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर हे उपस्थित होते. 

पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी सांगितले की,‘ विजयस्तंभास मानवंदना व अभिवादन करण्यासाठी प्रत्येक वर्षी लाखो अनुयायी येत असतात. मात्र या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मानवंदना कार्यक्रम प्रतिकात्मक आणि साध्या पद्धतीने साजरा व्हावा यासाठी शासनाने परिपत्रक काढले असून परिपत्रकानुसार कार्यक्रमासाठी या परिसरात बाहेरून कोणतीही व्यक्ती येणार नाही. यासाठी स्थानिक प्रशासनाने निर्बंध घालावे असे सांगण्यात आले असताना जिल्हाधिकारी यांनी कलम १४४ देखील लागू केले आहे. त्यानुसार ३० डिसेंबर २०२० पासून २ जानेवारी २०२१ सकाळपर्यंत बंदी घालण्यात आलेली आहे. या कार्यक्रमासाठी जे मोजके व्यक्ती उपस्थित राहणार आहेत त्यांना पोलीस प्रशासनाच्या पास देण्यात येणार असून ते पास लोणीकंद पोलीस स्टेशन, शिक्रापूर पोलीस स्टेशन तसेच पोलीस मुख्यालय येथून देण्यात येणार आहेत. त्यानुसार पास असणाऱ्या मोजक्या व्यक्ती वगळता इतर कोणतीही व्यक्ती या परिसरात येणार नाही यासाठी दक्षता घेतली जाणार आहे. 

सोशल मीडियावर चुकीची माहिती अथवा अफवा पसरविणाऱ्यांवर प्रतिबंध करण्यात आला असून परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम, सभा यांसह परिसरात फ्लेक्स बोर्ड होर्डिंग लावण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे देखील यावेळी डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले आहे. तर कामाला जाणाऱ्या व्यक्तींना कामावर जाता येणार असून त्यांनी ओळखपत्र ठेवणे बंधनकारक आहे, तसेच विजयस्तंभ परिसरातील अठरा गावांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले असून तेथील स्थानिक व्यवहार सुरु ठेवण्यात येणार असून स्थानिकांनी पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

या कालावधित प्रामुख्याने लोणीकंद पोलिस ठाणे हद्दीतील लोणीकंद, पेरणे, तुळापुर, बकोरी, वढु खुर्द, केसनंद, कोलवडी, डोंगरगाव, फुलगाव तसेच शिक्रापुर पोलीस ठाणे हद्दीतील कोरेगाव भीमा, डिंग्रजवाडी, सणसवाडी, वढु बुद्रुक, पिंपळे जगताप, वाजेवाडी, आपटी, वाडेगाव या अठरा गावांमध्ये बाहेर गावातील व्यक्तींना येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र या भागातील कारखानदारी व दैनंदिन व्यवहार सुरुच राहतील. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम प्रतिकात्मक स्वरुपात होणार असल्याने पेरणे विजयस्तंभ व परिसरात सभा,मंडप, खाद्य पदार्थ स्टॉल, पुस्तक स्टॉल, खेळणी विक्रीचे स्टॉलवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच बाहेर गावावरुन आलेल्या व्यक्तीना हॉटेल, लॉजेस इतर आस्थापनात वास्तव्यासही प्रतिबंध असेल.          प्रतिबंधात्मक आदेशातून अत्यावश्यक वैदयकीय, अग्नीशमन, पोलीस व अत्यावश्यक सेवेतील शासकीय अधिकारी, कर्मचारी, माध्यमांचे प्रतिनिधी व पोलीसांनी दिलेले पास धारकांनाही सवलत असेल. मानवंदनेसाठी येणारे पासधारक, शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांची कोवीड तपासणी व मार्गदर्शक सूचनांचे पालन तसेच मास्कचा वापर अनिवार्य असेल. तसेच आदेश मोडणा-यांवर कारवाईचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.------ग्रामीण भागातही जमावबंदीचा प्रस्ताव...नववर्षाच्या निमित्ताने शहराप्रमाणे ग्रामीण भागातही गर्दीची शक्यता असल्याने मावळ, मुळशी, हवेली तालुकयासह शिरुरमधील कोरेगाव भीमा, डिंग्रजवाडी, सणसवाडी, वढू बुद्रुक, पिंपळे जगताप, वाजेवाडी, आपटी, वाडेगाव या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्येही दि. २५ डिसेंबर ते दि. ५ जानेवारी २०२१ दरम्यान रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत जमावबंदीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला असल्याचे देशमुख यांनी सांगितले. --------------------- 

अशी सुरु किंवा बंद राहणार वाहतूक...  

येत्या १ जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे - नगर महामार्ग वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून येथील वाहतुक ३१ डिसेबर २०२० रोजी सायंकाळी पाचपासून ते एक जानेवारी २०२१ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. * चाकण ते शिक्रापूर व शिक्रापूर ते चाकण अशी दोन्ही बाजूकडील जाणारी येणारी सर्व प्रकारची वाहतूकही पूर्णपणे बंद असेल. तसेच अहमदनगर बाजूकडून पुणे, मुंबई बाजूकडे येणारी जड वाहने ही शिरुर, न्हावरा फाटा, न्हावरा, पारगांव, चौफुला, यवत, हडपसर या पयार्यी मार्गे पुण्याकडे येतील.

* पुणे बाजूकडून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड वाहने ही खराडी बायपास येथून हडपसर, पुणे- सोलापूर हमरस्त्याने चौफुला, केडगांव मार्गे न्हावरा, शिरुर, अहमदनगर अशी वळविण्यात येणार आहे. सोलापूर रस्त्याने आळंदी, चाकण या भागात जाणारी जड वाहने हडपसर, मगरपट्टा, खराडी बायपास मार्गे विश्रांतवाडी येथून आळंदी व चाकण येथे जातील.

* मुंबई येथून अहमदनगर बाजूकडून जाणारी जड तसेच माल वाहतूकीची वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगांव, आळेफाटा मार्ग अहमदनगर अशी जातील. मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी हलकी वाहने, (उदा. कार, जीप) वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरुर मार्गे अहमदनगर येथे जातील.    

टॅग्स :PuneपुणेBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या