शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

काम देण्याच्या बहाण्याने हजारो महिलांची फसवणूक : वर्ल्ड ट्रस्ट डायमनी संस्थेवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 17:07 IST

पुण्यात जवळपास १ हजार महिलांची अशाप्रकारे फसवणूक झाल्याचा अंदाज असून अजूनही तक्रार देण्यासाठी महिला येत आहेत़.

पुणे : काम देण्याच्या बहाण्याने हजारो महिलांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली वर्ल्ड ट्रस्ट डाय मनी संस्थेवर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महिलांचा गट स्थापन करुन त्यांना कापडी पिशव्या बनविण्याचे काम देण्याचा बहाणा करुन त्यांच्याकडून सदस्य फीच्या नावाखाली पैसे गोळा करुन दिलेल्या मालाचे पैसे न देता पोबारा केलेल्या या संस्थेविरोधात आतापर्यंत १ हजार महिलांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे तक्रार दिली आहे़.  

                 कंपनीचा सुत्रधार चेअरमन मनीष लोकरस त्याच्या सहायक जयश्री कोपर्डेकर आणि सुनिता दास अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत़. हा प्रकार जून ते २० नोव्हेंबर २०१८ दरम्यान घडला आहे़.  पुण्यात जवळपास १ हजार महिलांची अशाप्रकारे फसवणूक झाल्याचा अंदाज असून अजूनही तक्रार देण्यासाठी महिला येत आहेत़.  ६५१ रुपये ही छोटीशी रक्कम असल्याने महिलांनीही काम मिळत असल्याने कोणी अधिक चौकशी केली नाही़ पण, जेव्हा तयार केलेल्या पिशव्या कंपनीला पाठविल्यानंतरही पैसे मिळत नसल्याचे पाहून लोकांनी जयश्री कोपर्डेकर, मनीष लोकरस यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़ तेव्हा त्यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली व कार्यालय बंद केल्याने लोकांचा संशय वाढला़.  याबाबत पोलिसांनी सांगितले की, कात्रज येथे मनीष लोकरस याने वल्ड ट्रस्ट डाय मनी संस्थेचे कार्यालय सुरु केले होते़. त्या भागातील महिलांना तुम्ही गट स्थापन करा़. त्यांना आम्ही कागदी व कापडी पिशव्या, अगरबत्ती, मेणबत्ती व द्रोण तयार करण्यासारखे गृहउद्योग सुरु करुन देऊ़. तुम्हाला मालाचा पुरवठा करुन व तुमचा मालही घेऊ असे सांगितले़.  त्यासाठी तुम्ही सभासद फी म्हणून ६५१ रुपये भरा असे सांगितले़. याशिवाय  त्याने काही महिलांना आमच्याकडे पैसे गुंतवा तुम्हाला कमी कालावधीमध्ये जास्त पैसे मिळवून देतो, आकर्षक व्याज देतो, असे सांगून त्यांच्याकडून रोख स्वरुपात २० हजार, ३० हजार रुपये घेतले़. 

                  महिलांच्या एका १५० जणींच्या गटाने प्रत्येकी ६५१ रुपये प्रमाणे ९७ हजार रुपये दिले़ तसेच महिलांनी केलेल्या कामाचा पगार न देता व महिलांची गुंतविलेली अंदाजे १ लाख ६५० रुपये परत न करता महिलांची फसवणूक केली़.  या महिलांपैकी गटप्रमुखांना त्याने तुम्ही कच्चा माल तयार करण्यासाठी सुरुवातीला पैसे टाका़ तुम्ही पिशव्या बनविल्या की त्याच्याबरोबर तुमचे पैसे देतो, असे सांगितले होते़. त्याप्रमाणे गटप्रमुख महिलांनी स्वत: पैसे गुंतवणुक पिशव्या, मेणबत्त्या तयार केल्या़ त्या त्यांनी वर्ल्ड ट्रस्ट डाय मनीच्या कार्यालयात नेऊन दिल्या़ पण त्याचे पैसे त्याने दिले नाही़ या कार्यालयात त्याने नेमलेल्या कर्मचाऱ्यांना काही महिने पगार दिला़. त्यानंतर २० नोव्हेंबरपासून हे कार्यालय बंद पडले़. अशाच प्रकारे मनीष लोकरस याने राज्यभरात विविध ठिकाणी कार्यालये उभारुन सुमारे ४५ हजार महिलांकडून ६५१ रुपये सभासद फी म्हणून रोख स्वरुपात गोळा केली आहे़. कर्जत, यावल, कराड येथे आतापर्यंत गुन्हे दाखल केले आहेत़. कर्जत पोलिसांनी यापूर्वी जयश्री कोपर्डेकर यांना अटक केली होती़ परंतु, त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे़.  त्यानंतर मुख्य सुत्रधार मनीष लोकरस याला सांगलीतून अटक केली आहे़.  न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली असून त्यानंतर त्याला अटक करण्यात येणार असल्याचे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु पवार यांनी सांगितले़.  

टॅग्स :PuneपुणेMONEYपैसाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी